आपलं सौंदर्य आणि दमदार अभिनयाने ९० च्या दशकात प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला होय. जुहीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता ती फारसे चित्रपट करत नसली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जुहीने उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केलंय. जय व जुही यांना जान्हवी व अर्जुन नावाची दोन अपत्ये आहे. जुहीची लेक जान्हवी २३ वर्षांची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई अभिनेत्री असली तरी जान्हवीला मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नाही. जान्हवी मेहता अभ्यासात प्रचंड हुशार असून तिने मे २०२३ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. जान्हवीला अभिनेत्री व्हायचं नाही. तिला क्रिकेटची खूप आवड आहे आणि तिला लेखिका व्हायचं आहे. तसेच जान्हवीला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, असं तिच्या आईने सांगितलं होतं.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

जुही चावलाने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, बॉलीवूडमध्ये काहीतरी मोठं करण्याची स्पर्धा स्टार किड्समध्ये सुरू असताना दुसरीकडे तिची मुलगी जान्हवी मेहताला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. “स्वतःच्या मुलांचे कौतुक करू नये, पण ती एक हुशार मुलगी आहे आणि तिचा शैक्षणिक रेकॉर्डही खूप चांगला आहे. इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये तिने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने हिस्ट्री इन इंडियामध्ये अव्वल स्थान पटकावले होते. ती त्याच्या शाळेत पहिली आली होती, असं जुही चावला म्हणाली होती.

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

याशिवाय जुही चावलाने खुलासा केला होता की तिची मुलगी जान्हवी मेहताला क्रिकेट खूप आवडतं. “जेव्हा जान्हवी क्रिकेट आणि खेळाडूंबद्दल बोलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो. कधी कधी मला प्रश्न पडतो की हे सर्व ज्ञान कुठून येतं. मलाही खूप आश्चर्य वाटतं, पण तिने हे स्वतःसाठी निवडलं आहे, त्यामुळे मी त्याचे श्रेय घेऊ शकत नाही,” असं जुहीने सांगितलं होतं.

पारंपरिक लेहेंग्यावर स्निकर्स घालून थिकरली श्रद्धा कपूर; ‘मुझसे शादी करोगी’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा Video

जुही चावला पुढे म्हणाली, “ती (जान्हवी मेहता) त्या स्टार किड्सपेक्षा वेगळी आहे ज्यांना पडद्यावर स्वत:ला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून बघायचं आहे. मी पाहिलंय की अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला वाटतं की हा त्यांच्यावर दबाव आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi chawla daughter jahnavi mehta doesnt want to be actress know about her career choice education hrc