अभिनेत्री जुही चावलाने ‘ झलक दिखला जा ११’ या डान्स रिॲलिटी शोच्या ताज्या भागात हजेरी लावली. बॉलीवूडमधील तिची शानदार कारकीर्द ‘जश्न जुही का’ या विशेष भागासह साजरी करण्यात आली. हा भाग जुहीच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाला समर्पित होता. शोमधील स्पर्धक जुहीच्या ९० च्या दशकातील हिट गाण्यांवर परफॉर्म करताना दिसले. या भागात जुहीने तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल किस्सेही शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुही चावलाने मिस्टर परफेक्टिनिस्ट आमिर खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९८४ ची मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने १९८६ मध्ये ‘सुल्तनत’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. पण आमिर खानसह १९८८ मध्ये रिलीज झालेला ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने तिला यश व ओळख दोन्ही मिळवून दिलं. जुही आणि आमिरने ‘हम है राही प्यार के’, ‘दौलत की जंग’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘इश्क’, ‘अंदाज अपना अपना’, ‘डर’ यासारखे इतर चित्रपट देखील केले.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

‘झलक दिखला जा ११’ मध्ये जुहीने आमिरबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला. फराह खानने जुहीला विचारलं कोणत्याही सेलिब्रिटीकडून तुला मिळालेलं सर्वात स्वस्त गिफ्ट कोणतं होतं. त्यावर जुही म्हणाली, “मला त्याचं नाव सांगावं लागेल का? तो आमिर खान होता.”

जुही पुढे म्हणाली, “आम्ही तेव्हा नवीनच स्टार झालो होतो. माझा वाढदिवस होता आणि संध्याकाळी आमिरने फोन करून घरी येईन असं सांगितलं. तो मला शुभेच्छा देण्यासाठी घरी आला आणि माझ्या घरातील सर्वजण त्याला बघून खूप उत्साहित झाले. तो बसला आणि माझ्यासाठी एक लहान चॉकलेट काढले आणि म्हणाला ते माझे गिफ्ट आहे.”

“ती माझ्यावर ओरडते”, घटस्फोटानंतर किरण रावसह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “आम्ही एकत्र…”

‘इश्क’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण आणि आमिर सेटवर सतत काही ना काही करत असायचे, असं जुहीने सांगितलं. तसेच सेटवर नवीन असिस्टंट डायरेक्टर (एडी) आला होता आणि जेव्हा तो शॉटसाठी टाळी वाजवायला यायचा तेव्हा अजय आणि आमिर त्याची खिल्ली उडवायचे, ज्यामुळे तो असिस्टंट डायरेक्टर घाबरायचा. परिणामी दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्याकडून त्या एडीला अनेकदा बोलणी खावी लागायची. आमिर व अजय कधी कधी शॉटसाठी केलेल्या खुणा पुसून टाकत आणि दरवेळी एडीला बोलणी खावी लागायची. दिग्दर्शकाला माहीत नसायचं की हे सगळं आमिर व अजय करत आहेत, असं जुही म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi chawla says aamir khan gave her cheapest gift a small chocolate on birthday hrc