‘बार्बी’ व ‘ओपनहायमर’ या हॉलीवूड चित्रपटांनी सध्या जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन्ही चित्रपटांबद्दल भारतात जोरदार चर्चा सुरू आहे. लहान मुलांच्या मनात ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिला. याचदरम्यान लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जुही परमार आपल्या १० वर्षांच्या मुलीसह ‘बार्बी’ पाहण्यासाठी गेली होती. मात्र, संपूर्ण चित्रपट न पाहता सुरुवातीच्या १० ते १५ मिनिटांत ती मुलीला घेऊन चित्रपटगृहातून बाहेर पडली. त्यानंतर जुहीने ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल राग व्यक्त करीत निर्मात्यांना उद्देशून एक पत्र लिहिले. या पत्राद्वारे जुहीने नेमके काय म्हटले आहे जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : IIFM 2023 : कार्तिक आर्यनचा जागतिक पातळीवर ‘या’ पुरस्काराने होणार सन्मान! कारण आहे खूपच खास…

जुही परमारने एक पालक म्हणून ‘बार्बी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. ही अभिनेत्री लिहिते, “प्रिय ‘बार्बी’ सर्वप्रथम मी माझी चूक मान्य करते. कारण- माझ्या १० वर्षांच्या समायराला मी तुमचा चित्रपट पाहायला घेऊन गेले. हा चित्रपट ‘पीजी-१३’ (पॅरेंटल गायडन्स अंडर १३) आहे याकडे मी लक्ष दिले नाही. चित्रपट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या १० मिनिटांत असलेले आक्षेपार्ह भाषा, सीन्स पाहून मला चित्रपटगृहातून बाहेर पडावे लागले. मी माझ्या मुलीला हे काय दाखवले, असा प्रश्न मला पडला. ती तुमचा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक होती; परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मला धक्का बसला आणि मी निराश झाले.”

हेही वाचा : “दोन नाटकं, मालिकेत काम करून तुम्ही थकत नाही का?”, चाहतीला उत्तर देत निवेदिता सराफ म्हणाल्या, “मनापासून सांगते…”

निर्मात्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत जुही पुढे लिहिते, “सुरुवातीच्या १० ते १५ मिनिटांत मी बाहेर पडले. अनेक पालक त्यांच्या लहान मुलांसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छिते की, तुमच्या चित्रपटाची भाषा १३ वर्षांखालील नाही, तर त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही अयोग्य आहे.”

हेही वाचा : Video : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या अभिनेत्रीने केली खास कमेंट

“चित्रपटगृहातून घरी आल्यावर मी ‘बार्बी’चे प्रोमो तपासले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आक्षेपार्ह भाषा, सीन्स प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. मग ही लोकांची दिशाभूल नाही का? पण, हे केवळ ‘बार्बी’बद्दल नसून आमच्याकडीलसुद्धा निम्म्याहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये खूप अयोग्य कंटेंट दाखवला जातो. तुमच्यापैकी काही जणांना माझे मत पटणार नाही किंवा राग येईल. पण, हे पत्र सगळ्या पालकांसाठी आहे. मी केलेली चूक तुम्ही करू नका. कृपया चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा.” असे जुहीने या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, ‘बार्बी’ चित्रपटात मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच इजा रे, दुआ लिपा, एम्मा मॅक्ये, सीमू लियू यांसारख्या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Juhi parmar accuses barbie makers of misleading shared letter on instagram sva 00