Loveyapa box office collection day 2: बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. ‘लवयापा’ असं जुनैदच्या नव्या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तो दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी खुशी कपूरसह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली तरी दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित वाढ झाली आहे. पण, जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाचा चित्रपट चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने प्रदर्शित झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. दोन दिवसांमध्ये जुनैद खान-खुशी कपूरच्या या चित्रपटाने २.६५ कोटींची कमाई केली आहे. परंतु, पाहिजे तसा चित्रपटाला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.

पहिल्या दिवशी ‘लवयापा’ चित्रपटाने १.१५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १.५० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे आतापर्यंत २.६५ कोटींचा व्यवसाय ‘लवयापा’ चित्रपटाने केला आहे. पण, ‘लवयापा’ चित्रपटाच्या तुलनेत हिमेश रेशमियाचा ‘बॅडएस रविकुमार’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

सॅकनिल्क रिपोर्टनुसार, ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला ‘बॅडएस रविकुमार’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २.७५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी २ कोटी कमावले. दोन दिवसांत हिमेश रिमेशियाच्या या चित्रपटाने ४.७५ कोटींची कमाई केली आहे. याचाच अर्थ ‘लवयापा’ चित्रपटापेक्षा दुप्पट कमाई ‘बॅडएस रविकुमार’ करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘लवयापा’ चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ‘बॅडएस रविकुमार’ व्यतिरिक्त ‘सनम तेरी कसम’ आणि ‘थांडेल’ हे चित्रपट देखील आहेत.

‘लवयापा’ चित्रपटाची कथा?

‘लवयापा’ चित्रपटात एक कपल दाखवण्यात आलं आहे, जे आपासात फोन बदलण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर बरेच खुलासे होतात. जे एका बाजूला धक्कादायक असतात. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. ‘लवयापा’ चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर व्यतिरिक्त आशुतोष राणा, किकू शारदा यांनी खूपच चांगलं काम केलं आहे.