बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)वर वांद्रे येथील त्याच्या घरात हल्ला झाला आहे. एका दरोडेखोराने अभिनेत्यावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना गुरूवारी पहाटे घडली. अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय तसेच कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने धक्का बसल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले, “सैफ सरांवर हल्ला झाल्याचे ऐकल्यानंतर धक्का बसला, तसेच वाईटही वाटले. ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे”, असे लिहित सैफ अली खान लवकर बरा व्हावा, असे अभिनेत्याने म्हटले आहे.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”

सैफ अली खान व ज्युनिअर एनटीआर यांनी नुकतेच एकत्र काम केले होते. ‘देवरा पार्ट १’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटात जान्हवी कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. हा ॲक्शन चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पूजा भट्टनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, याआधी कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते, असे तिने तिच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे; तर शेफ कुणाल कपूरने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत ऐकल्यानंतर धक्का बसल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे मध्यरात्री एक दरोडेखोर अभिनता सैफ अली खान व करीना कपूर यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात शिरला होता. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. या झटापटीत अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, सध्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Story img Loader