करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ हा लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांपैकी एक आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. आजही या चित्रपटातील डायलॉग, गाणी सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. सध्या या चित्रपटातील छोटी ‘पू’ म्हणजेच अभिनेत्री मालविका राज चर्चेत आली आहे. निमित्त आहे तिचं थाटामाटात पार पडलेलं लग्न.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मालविका राज आणि बिझनेसमॅन प्रणव बग्गा यांचा मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा पार पडला होता. माता की चौकी करून साखरपुड्याची सुरुवात केली. या साखरपुड्याला ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉक यांनी त्यांच्या पत्नी आयशा श्रॉफसह हजेरी लावली होती. तसेच अभिनेत्री भाग्यश्री या मुलगा अभिमन्यु दाससह उपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर काल (३० नोव्हेंबर) मालविका आणि प्रणवचा गोव्यात शाही लग्नसोहळा झाला. दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी मालविका आणि प्रणवला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – शशांक केतकरला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना घेऊन जायला आवडेल डेटवर; अभिनेता म्हणाला, “मला…”
दरम्यान, लग्नासाठी खास मालविका राजने गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा परिधान केला होता. तर पती प्रणवने गोल्डन एम्ब्रॉयडरी शेरवानी घातली होती. दोघांची जोडी खूपच छान दिसत होती.
हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत वरचढ ठरली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आलेली कला; जुन्या मालिकांना मागे टाकतं मारली बाजी
मालविकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्क्वाड’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती. ‘झी-५’वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद मिळता नव्हता. सध्या मालविका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय असते. तसेच तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य इंडस्ट्रीचा भाग आहेत. मालविका ही अभिनेता जगदीश राज यांची नात, तर बॉबी राज यांची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अनीता राज यांची भाची आहे. कॉस्ट्यूम डिजाइनर सोनाक्षी राज ही तिची बहीण आहे. तर मालविकाची आई रीना राज बॉलीवूडमधील मोठ्या निर्मात्या आहेत.