करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. आता या चित्रपटातील पू म्हणजे पूजा ही भूमिका साकारलेली अभिनेत्री मालविका राजने साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे. तिनं स्वतः सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
मालविकाने बिझनेसमॅन प्रणव बग्गाबरोबर साखरपुडा केला आहे. तिनं यासंबंधीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच हे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे आणि इतक्या वेळानंतर आमची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही भेटलो होतो.”
हेही वाचा – सलमान खानचे फॉलोवर्स कमी झाले म्हणून राखी सावंत भडकली; व्हिडीओ झाला व्हायरल
अभिनेत्री मालविकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या सुंदर गाउनमध्ये दिसत आहे. तर प्रणव बग्गाने सुद्धा पांढरा रंगाचा साधा शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. टर्कीतील कॅपाडोशियामधील मालविका-प्रणवचे हे फोटो आहेत.
हेही वाचा – Video: “…तेव्हा माझा अहंकार दुखावला” पल्लवी जोशींनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाल्या…
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”
दरम्यान, मालविकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्क्वाड’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती. ‘झी-५’वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद मिळता नव्हता. सध्या मालविका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय असते. तसेच तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य इंडस्ट्रीचा भाग आहेत. मालविका ही अभिनेता जगदीश राज यांची नात, तर बॉबी राज यांची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अनीता राज यांची भाची आहे. कॉस्ट्यूम डिजाइनर सोनाक्षी राज ही तिची बहीण आहे. तर मालविकाची आई रीना राज बॉलीवूडमधील मोठ्या निर्मात्या आहेत.