कबीर बेदी आणि परवीन बाबी हे काही काळ एकत्र नात्यात होते. त्यांचे नाते अत्यंत अल्प काळ टिकले. परवीन बाबी या कबीर बेदी यांच्याबरोबर नात्यात येण्याआधी मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या. एका मुलाखतीत कबीर बेदी यांनी त्यांच्या नात्याच्या शेवट कसा झाला याबद्दल सांगितले. त्यांनी परवीन यांना वैद्यकीय उपचार घेण्यास सुचवले होते. मात्र, त्या यासाठी तयार नव्हत्या. कबीर बेदी यांच्या म्हणण्यानुसार, परवीन यांनी त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण- त्यांना वाटत होते की, कबीर त्यांच्यावर उपचारांसाठी दडपण टाकतील.

“परवीन यांच्याकडून उपचारांना नकार”

कबीर बेदी यांनी ‘डिजिटल कमेंट्री’ या प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना सांगितले की, ते सँडोकन या टीव्ही शोमुळे आंतरराष्ट्रीय स्टार बनत असतानाच परवीन या त्यांच्याबरोबर इटलीला गेल्या होत्या. त्यानंतर ते दोघे लंडनला गेले, तेव्हा कबीर यांना जाणवले की परवीन यांची मानसिक स्थिती अधिकच बिघडत आहे. त्यांनी परवीन यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला; मात्र परवीन यांनी ते स्पष्टपणे नाकारले. कबीर म्हणाले, “परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला उपचार घेण्यास सांगितलं; मी तिची परिस्थिती वाईट होत असल्याचे पाहत होतो. परंतु ती उपचार घेण्यास तयार नव्हती. मला माहीत होतं की, जर तिने उपचार घेतले नाहीत, तर परिस्थिती आणखी बिकट होईल.”

हेही वाचा…सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…

माध्यमांच्या आरोपांना उत्तर

परवीन बाबी यांचे मानसिक आरोग्य बिघडण्यामागे कबीर बेदी असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या होत्या. कबीर बेदी यांनी हे आरोप खोटे होते असे सांगितले. ते म्हणाले, “माध्यमांनी माझ्यावर आरोप केला की, मी परवीनला आपले नाते पुढे जाऊ शकत नाही, असे म्हणून नकार दिल्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली. परंतु, ती आधीच मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होती.”

परवीन बाबी यांचा दुर्दैवी अंत

परवीन बाबी यांच्या मृत्यूने कबीर बेदी यांना तीव्र दु:ख झाले. त्यांनी सांगितले की परबीन बाबी यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत झाला. परबीन बाबी यांच्या अंत्यसंस्काराला कबीर बेदी, महेश भट्ट व डॅनी डेन्जोंगपा उपस्थित होते.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे

कबीर बेदींच्या आत्मचरित्रात सविस्तर…

कबीर बेदी यांनी त्यांच्या स्टोरीज ‘आय मस्ट टेल द इमोशनल लाईफ ऑफ ॲन ॲक्टर’ या आत्मचरित्रात परवीन बाबी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यांनी परवीन बाबी यांच्या मानसिक आरोग्याविषयी, तसेच त्यांच्या महेश भट्ट आणि डॅनी डेन्जोंगपा यांच्याशी असलेल्या नात्यांविषयीही सांगितले.

Story img Loader