बॉलीवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण आणि काजोलची लेक निसा ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ती शहरात कुठे गेली तर तिथलेही तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती धडपडताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पांढऱ्या फ्रॉकमधील ही गोंडस मुलगी आहे बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

निसा कारमध्ये बसायला गेली, पण कारच्या दाराजवळ तिचा तोल गेला अन् ती पडता पडता वाचली. निसाला तिच्या मैत्रिणीने पडण्यापासून वाचवलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करून निसाला ट्रोल करत आहेत.

‘ही निसा नाही तर नशा आहे’, ‘ही कायम धडपडत असते’, ‘ती धडपडली यात काहीच नवीन नाही’, ‘हिला नेहमी काही ना काही लागत असतं,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

निसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
निसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, निसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये ती चालता चालता धडपडताना दिसते. त्यामुळे हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol ajay devgn daughter nysa devgan trolled check viral video netizens comments hrc