बॉलिवूड अभिनेत्री काजोल लवकरच अमित शर्मा दिग्दर्शित ‘लस्ट स्टोरीज २’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यात कुमुद मिश्राचीही भूमिका आहे. दरम्यान काजोल आणि अमित शर्मा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. एका मुलाखतीदरम्यान काजोलने अमित यांना एक प्रश्न विचारून कोंडीत पकडले होते.

हेही वाचा- “दारू पिऊन त्यानं माझ्याबरोबर…” अभिनेता रणवीर शौरीबरोबच्या नात्याबाबत पूजा भट्टचे मोठे विधान; ब्रेकअपचे कारण सांगत म्हणाली…

एका मुलाखतीत काजोलने अमित यांना काजोल आणि अजय देवगण यांच्यात कलाकार म्हणून कोण चांगल आहे? असा प्रश्न विचारला. यावर अमित हसायला लागले आणि त्यांनी काजोलकडे बोट दाखवले. परंतु पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर अमित हसले आणि म्हणाले, “मी उत्तर दिले आहे.” काजोल आणि अजय देवगण यांच्यातील साम्य सांगताना अमित म्हणाले, “दोघेही वक्तशीर आहेत. दोघेही वेळेवर सेटवर पोहोचतात. दोघांनाही कसलाही आकस नाही. दोघेही चांगले कलाकार आहेत.” अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट अमित आर शर्माने दिग्दर्शित केला आहे.

अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘मैदान’ हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलल्याचं म्हटलं जात आहे. ‘भोला’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटांनंतर अजय देवगणच्या या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा- डोंगर, झाडी आणि बरंच काही …! करण देओल व द्रिशा आचार्यच्या हनिमूनचे फोटो व्हायरल

दुसरीकडे, ‘लस्ट स्टोरीज २’ बद्दल बोलायचे झाले तर काजोल व्यतिरिक्त नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा सारखे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. ही वेब सिरीज २९ जूनला OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.