अभिनेत्री काजोलची ‘द ट्रायल’ मधील सहकलाकार नूर मालाबिका दास हिचा मृतदेह ६ जून रोजी तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये सापडला. ३७ वर्षांची अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी लोखंडवाला येथील एका फ्लॅटमधून तिचा कुजलेला मृतदेह जप्त केला होता. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. तिच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती तिच्या शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.

मुंबई पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला असून नूरच्या मूळ गावी असलेल्या कुटुंबियांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एका एनजीओने रविवारी अभिनेत्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तिच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कुजलेल्या अवस्थेत आढळला काजोलच्या को-स्टारचा मृतदेह, तीन दिवस वाट पाहूनही कुटुंबीय न आल्याने अभिनेत्रीवर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनेत्री नूर मालाबिका दासच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. तिच्या मृत्यूप्रकरणाचा तपास खूनाच्या शक्यतेतूनही केला जावा, असं त्यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन तुम्हाला विनंती करत आहे की अभिनेत्री नूर मालाबिका दास हिच्या आत्महत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा. सत्य समोर येईल व तिला न्याय मिळेल यासाठी तुम्ही सर्व संभाव्य दिशेने याची चौकशी करावी, अशी विनंती आम्ही करत आहोत,” असं पत्रात म्हटलं आहे.

‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…

असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “नूरचा अकाली मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आत्महत्यांच्या ट्रेंडची आठवण करून देणारा आहे. बॉलीवूडमध्ये अशा दुःखद घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे यामागच्या मूळ कारणांचा सखोल तपास करणं आवश्यक आहे.”

“स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दबाव…”, बॉलीवूड अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यात…”

नूर मालाबिकाच्या जवळच्या मित्रांपैकी एक अभिनेता आलोकनाथ पाठकने अभिनेत्रीच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितलं की तो नूरला अनेक वर्षांपासून ओळखतो. दोघांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या महिन्यापर्यंत नूरचे कुटुंब तिच्यासोबत मुंबईत राहत होते आणि आठवडाभरापूर्वीच ते गावी परत गेले, अशी माहिती त्याने दिली.