देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या २४ ऑक्टोबरपासून सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच ठिकठिकाणी सुरु असलेली आतेषबाजी, सजावट यामुळे दिवाळीपूर्वीच सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळीची मजा-मस्ती पाहायला मिळत आहे. आयुष्मान खुराना, क्रिती सेनॉन यानंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळीनिमित्त एका अलिशान पार्टीचे आयोजन केले होते. या निमित्ताने सर्व बॉलिवूड कलाकार एकत्र आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता या दिवाळी पार्टीतील एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि काजोलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘उठा उठा दिवाळी आली…’ सांगणाऱ्या ‘अलार्म काकां’बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीये का?

अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काजोल आणि माधुरी दीक्षित दोघीही दिसत आहे. अवघ्या काही सेकंदाचा असलेल्या या व्हिडीओ त्या दोघीही मजा करताना दिसत आहे. त्यात त्या एका इंग्रजी गाण्याचे बोल गुणगुणताना दिसत आहे. त्यावर त्या दोघीही नाचताना दिसत आहेत. काजोल आणि माधुरीचा हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे. या व्हिडीओला काजोलने हटके कॅप्शनही दिले आहे.

“माझ्याबरोबर डान्स फ्लोअरवर खूप खूप धमाल-मस्ती केल्याबद्दल डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित तुमचे खूप खूप आभार. त्याबरोबर मनीष मल्होत्रा तुम्ही या दिवाळी पार्टीचे आयोजन केल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तसेच माझ्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही उत्सव साजरा करण्याची वेळ आहे”, असे काजोलने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. तिचे हे कॅप्शन चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “मी बालिश…” सतत चिडचिड करणाऱ्या स्वभावावर जया बच्चन स्पष्टच बोलल्या

काजोल आणि माधुरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्यांचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यांची स्तुती केलीआहे. तर काहींनी त्या सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या पार्टीत अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, विकी कौशल-कतरिना कैफ, क्रिती सेनॉन, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, सारा अली खान, नव्या नंदा, रवीना टंडन, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा, काजोल यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol dances with madhuri dixit in manish malhotra diwali party video viral nrp