‘द : ट्रायल’ वेब सीरिजमध्ये काजोलने ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडला. या सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारणार आहे. काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या सीरिजमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन केला. तिच्या या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा होत आहे. हा सीन काजोलवर बंद खोलीत चित्रीत करण्यात आला होता.
सीरिजमध्ये विशालची भूमिका करणारा ब्रिटिश पाकिस्तानी अभिनेता अली खानच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अलीने काजोल आणि त्याच्या इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला होता. अलीने मुलाखतीत सांगितलं होतं की काजोल त्याची क्रश आहे. ही सीरिज साईन करण्याआधी त्याला माहित होतं की काजोल आणि त्याचा किसिंग सीन असणार आहे.
अली म्हणाला, “या सीनच्या शूटिंगपूर्वी मी व काजोल याबद्दल बोललो होतो. या सीनची ३ ते ४ वेळा रिहर्सलही केली. हा किसिंग सीन बंद खोलीत शूट करण्यात आला होता. त्यावेळी क्रूचे मोजकेच लोक उपस्थित होते आणि अजय देवगण त्यावेळी सेटवर नव्हता. सीन संपल्यानंतर मी काजोलला विचारले तू खुश आहेस का? उत्तरात काजोल ‘थँक्स माय डार्लिंग’ असं म्हणाली होती.
या सीनबद्दल बोलताना अली म्हणाला की, ‘मला वाटत नाही की या सीनमध्ये लैंगिक भावना होती.’ दरम्यान, यामध्ये काजोलसह जिशू सेनगुप्ता, कुबरा सैत, शीबा चड्ढा, अली खान, गौरव पांडे, विजय विक्रम सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.