बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री जेव्हा चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतात आणि बऱ्याच वर्षांनी कमबॅक करतात तेव्हा या नव्या स्पर्धेत टिकणं त्यांच्यासाठी कठीण होतं. पण अभिनेत्री काजोल हिने ही गोष्ट खोडून काढली आहे. आजही काजोल कित्येक अभिनेत्रींवर भारी पडते. काजोलच्या अभिनयाची आजही कित्येक लोक प्रशंसा करतात. गेले काही दिवस काजोल सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

नुकतंच काजोलने सिंगिंग रिअॅलिटी टीव्ही शो ‘सा रे ग म प लिल चॅम्प्स’मध्ये काजोलने हजेरी लावली. हा भाग काजोलच्या चित्रपटविश्वात ३० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काजोलने बरीच धमाल केली. तिच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी काजोलने शेअर केल्या. या एपिसोडमध्ये काजोल तिच्या पाककौशल्याबद्दल बोलत होती. दरम्यान, तिने पती अजय देवगणच्या स्वयंपाकाच्या छंदाबद्दलही सांगितले.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

आणखी वाचा : “माझ्या मुलीला बलात्काराच्या…” अनुराग कश्यपचा जीवनातील खडतर आणि चिंताजनक प्रसंगांविषयी खुलासा

अजय हा एक चांगला अभिनेता आहेच पण त्याबरोबर तो चांगला कूकदेखील आहे, असं काजोलने स्पष्ट केलं. याबरोबरच काजोलने अजय देवगणच्या पाककौशल्याबद्दलही बरीच गुपितं सांगितली आहेत. काजोल म्हणाली, “तुमचा विश्वास बसणार नाही, पण स्वयंपाक ही अजयची अत्यंत आवडती गोष्ट आहे. काही लोकांच्या हातालाच एक विशिष्ट चव असते, अगदी तीच गोष्ट अजयसाठी लागू होते. तो जे काही बनवतो ते अत्यंत चविष्ट असतं.”

इतकंच नाही तर काजोलने तिच्या फेवरेट पदार्थाविषयीही खुलासा केला. अजय देवगणने बनवलेली एक डिश काजोलला खूप आवडते आणि त्याची रेसिपी काही केल्या अजय शेअर करत नाही असं काजोलने या कार्यक्रमात खुलासा केला. ती डिश म्हणजे खिचडी. काजोल म्हणाली, “अजय बऱ्याचदा माझ्यासाठी खिचडी बनवतो, आणि ही खरंच त्याची सर्वोत्कृष्ट डिश आहे. मला ती प्रचंड आवडते, पण आजवर त्याने या खिचडीची रेसिपी मला सांगितली नाही. किचनमध्येसुद्धा तो दरवाजा बंद करून ही खिचडी बनवतो.” असंही तिने सांगितलं. काजोल रेवती दिग्दर्शित ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिचे चाहते आणि प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

Story img Loader