काजोल ही बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच काजोलने ‘ट्रायल’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले. आज काजोल तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

हेही वाचा : “आमच्या लाडक्या…”, ‘रॉकी और रानी’पाहून अमृता खानविलकर भारावली, क्षिती जोग आणि रणवीरसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

काजोल आणि अजय देवगण यांना युग आणि निसा अशी दोन मुलं आहेत. निसा देवगणला अनेकदा इंडस्ट्रीमध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याविषयी काजोलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. काजोलला निसाला वारंवार ट्रोल केले जाते याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता अभिनेत्री म्हणाली, “मी मुलांना या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असे सांगून ठेवले आहे. तुम्ही स्वत:च्या मनाचा विचार करा…इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही.”

हेही वाचा : Scam 2003 : “मास्टरमाइंड तेलगी अन् ३० हजार कोटींचा घोटाळा…”, ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार टीझर प्रदर्शित

“मी मुलांना सांगते या ट्रोलिंगच्या घटनांचा चिमूटभर मिठाप्रमाणे (एक चुटकी नमक की तरह) विचार करा…हे विषय फारसे गांभीर्याने घेऊ नका. कारण, आपण कोणीही प्रत्येकासमोर आपली बाजू स्पष्ट करू शकत नाही. कलाकारांना निर्दयीपणे ट्रोल करणे काही जणांना खूप आवडते. माझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेन की, सोशल मीडियावर १०० लोकांचे ऐकण्यापेक्षा तुम्हाला योग्य वाटेल ते करा.” असे सांगत काजोलने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा : “सर्वांगसुंदर असं नाटक…”, सैराट फेम रिंकू राजगुरुने पाहिलं आयुष्यातील पहिलं नाटक, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, काजोल अलीकडेच ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजच्या आणि ‘लस्ट स्टोरीज २’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Story img Loader