काजोल ही अनेक दशकांपासून तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. काजोलला मराठीही व्यवस्थित कळतं आणि ती ते चांगलं बोलते. पण आतापर्यंत तिने मराठी चित्रपटात कधीही काम केलेलं नाही. आता यामागचं कारण तिने स्पष्ट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ती तिच्या आगामी चित्रपटाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भरभरून बोलत आहे. तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत “तू मराठीत का काम करत नाहीस?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने मराठी चित्रपटांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं आहे.

आणखी वाचा : “ही तर सौंदर्या २.०…”; गौतम विगच्या ‘त्या’ फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

काजोल म्हणाली, “मी गेली अनेक वर्ष हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करतेय. मला हिंदी भाषेत अभिनय करायची सवय झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेत संवाद म्हणत अभिनय करणं मला जमेल का? अशी शंका माझ्या मनात येते. त्यामुळे अजूनही मराठीत काम न करण्याचं हेच एकमेव कारण आहे. नाहीतर मला मराठीच काय तर बंगाली चित्रपटांमध्येही काम करायला आवडेल.”

हेही वाचा : Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

दरम्यान काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल, राजीव खंडेलवाल, विशाल जेठवा, आहाना कुमरा, प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader