९० च्या काळापासून ते आतापर्यंत एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या काजोलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काजोलची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून बसते. काजोलचे जगभरात लाखो चाहते आहेत. अनेकदा ती चाहत्यांना भेटून, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधते. परंतु, एकदा काजोलच्या एका चाहत्याला तिच्या भेटीचा एक वाईट अनुभव आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या काजोलच्या फॅनची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. यात काजोलच्या चाहत्याच्या बहिणीनं अशी तक्रार केली होती की, मुंबई जुहू येथील एका उच्चस्तरीय रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तिच्या ऑटिस्टिक भावाबरोबर काजोल अत्यंत उद्धट वागली होती. बॉली ब्लाईन्ड्स अ‍ॅण्ड गॉसिप (r/BollyBlindsNGossip) या रेडिट अकाउंटवरून ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

हेही वाचा… “दोनवेळचं जेवण मिळायचं नाही”, अभिजीत खांडकेकरने सांगितला पहिल्या मालिकेतील ‘तो’ अनुभव, म्हणाला…

रेडिटवर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये असं लिहिलंय, “ज्या रेस्टॉरंटमध्ये माझा भाऊ काम करीत होता तिथे काल काजोल तिच्या काही मित्रांबरोबर आली होती. हे पाहून त्याला खूप आनंद झाला. तो सहसा दुसरं काम करतो; पण तिचं जेवण संपल्यानंतर परवानगी घेऊन त्यानं तिचं बिल हाताळण्याची जबाबदारी घेतली.”

“माझ्या भावाला तिला फक्त एवढंच सांगायचं होतं की, काजोलमुळे त्याचं आयुष्य खूप सुखकर झालं आहे आणि तिच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या. तिला पाहून माझा भाऊ भारावून गेला आणि रडू लागला; पण ती त्याला म्हणाली की, झालं तुझं? आता तुझी नाटकं बंद कर आणि बिल घे! एवढंच नाही तर नंतर तिनं मॅनेजरकडे अशा लोकांना कामावर ठेवू नका, अशी तक्रार केली.”

हेही वाचा… “आता मी काय करू?”, ‘ठरलं तर मग’फेम अभिनेता पडला गोंधळात; प्रेक्षकांना प्रश्न विचारत म्हणाला…

“मला मनापासून तुला म्हणावंसं वाटतं की, काजोल तू खूप वाईट आहेस. तू साधं त्याला धन्यवाददेखील म्हणू शकली नाहीस. त्यानं असंही काही केलं नव्हतं; जेणेकरून तुझ्या जेवणात व्यत्यय येईल.”

हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

काजोलच्या फॅनची ही जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या पोस्टवर असंख्य लोकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकानं नाराजी व्यक्त करीत कमेंटमध्ये लिहिलं, “ती बॉलीवूडमधली सर्वांत उद्धट सेलिब्रिटी आहे.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “तिनं साकारलेल्या भूमिकांसारखी ती अजिबात नाही आहे.”

दरम्यान, काजोलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, काजोल ‘दो पत्ती’ या आगामी चित्रपटात क्रिती सेनॉनबरोबर झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol rude behaviour against autistic fan netizens trolled post viral dvr