बॉलीवूड अभिनेत्री काजोलने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘लस्ट स्टोरीज २’ आणि ‘ट्रायल’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी यापूर्वी ‘समान काम, समान वेतन’ याविषयी भाष्य केले होते. आता याबाबत काजोलनेही आपले स्पष्ट मत मांडले आहे.
काजोलने ‘जागरण फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अभिनेत्रींच्या समान वेतनासंदर्भाच्या प्रश्नावर आपले मत मांडले. अभिनेत्री म्हणाली, “आपला भारत देश हा प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आता सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांना विविध चित्रपट आणि सीरिज पाहायला मिळत आहेत. भारतात सर्वप्रथम ‘वंडर वूमन’वर आधारित चित्रपट बनवले पाहिजे. जर त्या चित्रपटांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’सारखी चांगली कमाई केली. तरचं अभिनेत्री समान वेतनाची मागणी करू शकतात.”
हेही वाचा : “रस्त्यात एका बाईने जोरात फटका मारला अन्…”, खलनायिकेची भूमिका करताना ईशा केसकरला आला होता असा अनुभव
काजोलने नमूद केल्याप्रमाणे शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात ५४३ कोटींचा गल्ला जमावला होता. तसेच काजोलने सुद्धा करिअरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ‘कुछ कुछ होता हैं’ सारखे चांगले चित्रपट केले आहेत. काजोलआधी दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पुदकोण या अभिनेत्रींनीही समान वेतनाबाबत आपले मत मांडले होते.
हेही वाचा : “माझं जगणं मुश्किल…” आयुष्यातील वाईट दिवसांवर किरण मानेंचं भाष्य, म्हणाले, “आरोप करणारे खरे असते तर मी…”
दरम्यान, अलीकडेच काजोल ‘ट्रायल’ या वेबसीरिजच्या आणि ‘लव्ह स्टोरीज २’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘ट्रायल’मध्ये काजोलने साकारलेल्या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.