बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ नेटफ्लिक्सवर २९ जूनला प्रदर्शित होणार असून यात काजोल मुख्य भूमिका साकारणार आहे. सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत कसा बदल झाला आणि स्त्रीसुख याबद्दल काजोलने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “‘आशिकी ३’मध्ये काम करणार का?” प्रश्न ऐकताच आदित्य रॉय कपूर म्हणाला, “माझी खूप इच्छा आहे, पण…”

काजोलने अलीकडेच ‘फिल्मफेअर’ दिलेल्या मुलाखतीत स्त्रीसुखाविषयी (फिमेल प्लेजर) भाष्य केले आहे. अभिनेत्री म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा आपण सगळे या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधत होतो. मात्र, आता अशा विषयांवर बोलणं आपण सर्वांनीच बंद केले. पण, स्त्रीसुख हा आपल्या विशेषत: महिलांच्या जीवनातील एक भाग आहे. ज्याप्रमाणे खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत आपण दैनंदिन जीवनात चर्चा करतो अगदी त्याप्रमाणे आपण स्त्रीसुखाविषयी मोकळेपणाने का बोलत नाही? अशा गोष्टींबद्दल चर्चा करणे, संवाद साधणे खूप आवश्यक आहे.”

हेही वाचा : Video: मुंबई बॉम्बस्फोट, तरुणांचे ब्रेनवॉश अन्…सेन्सॉर बोर्डाने नाकारल्यानंतरही निर्मात्यांनी प्रदर्शित केला ’72 Hoorain’चा ट्रेलर

काजोल म्हणाली, “आधीच्या काळात चित्रपटांमध्ये लैंगिक संबंधांविषयी काहीही दाखवायचे असल्यास दोन फुलांचे मिलन झाले, अशा प्रकारचे सीन्स पडद्यावर दाखवले जायचे. त्यानंतर संबंधित अभिनेत्री गरोदर व्हायची. पण, आता काळानुसार खूप गोष्टी बदलल्या आहेत. आजकालच्या तरूणपिढीचे एकापेक्षा जास्त प्रियकर असतात, खऱ्या प्रेमावर फार कमी लोकांचा विश्वास असतो. आता प्रेमासाठी कोणीही जीव देणार नाही. अलीकडेच्या चित्रपटांमधील प्रेमकथाही मैत्री, आधुनिक नातेसंबंध, समाज यावर आधारित आहेत.”

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ बद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट २९ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, यामध्ये काजोलशिवाय नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि विजय वर्मा यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol says female pleasure should be normalised like eating and drinking sva 00
First published on: 28-06-2023 at 20:14 IST