बॉलीवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. काजोलची लेक निसाही सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. काजोलने आज इन्स्टाग्राम स्टोरीवर लेकीबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेली काजोल पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे. ‘द ट्रायल’, ‘लस्ट स्टोरीज २’मधून आपल्या अभिनयाने तिने पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या या दमदार कमबॅकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. आता काजोलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगी निसाबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे. तिने निसाला तिचा अॅटिट्युड सुधारण्याचा सल्ला दिला, त्यावर लेकीने काय प्रतिक्रिया दिली ते काजोलने सांगितलं.
निसा देवगणचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन नक्की आहे तरी कोण? पार्टीतील ‘त्या’ फोटोंमुळे आहे चर्चेत
मी माझ्या मुलीला तिचा अॅटिट्युड सुधारण्यास सांगितलं. मग तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘माझ्या अॅटिट्युडबद्दलच्या तक्रारींसाठी माझ्या निर्मात्याशी (आई-वडिलांशी) संपर्क साधा.’ तिच्या या उत्तरावर काजोलने ‘खूप छान, खूप छान उत्तर’ असं लिहिलं.
दरम्यान, काजोल व तिची लेक निसाचं खूप छान बाँडिंग आहे. काजोल अनेकदा लेकीबरोबर फोटोशूट करते, तसेच फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. आता काजोलने केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.