माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेल्या ‘पंचक’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मराठीसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी माधुरीला ‘पंचक’साठी शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री काजोलने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
काजोल आणि माधुरी या दोन्ही अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये ९० चं दशक गाजवलं होतं. त्या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे काजोलने नुकताच माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर शेअर करत अभिनेत्रीने माधुरीसह श्रीराम नेनेंना ‘पंचक’साठी शुभेच्छा दिल्या आहेत. या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर काजोल लिहिते, “माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे दोघंही आपल्या नववर्षाची दमदार सुरूवात करण्यासाठी सज्ज आहेत. हा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. तुम्हा दोघांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा!”
हेही वाचा : पूजा सावंतला भावले होणाऱ्या नवऱ्याचे ‘हे’ गुण! खुलासा करत म्हणाली, “त्याला चांगलं माहितीये…”
काजोलने शेअर केलेली पोस्ट माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर करत तिचे आभार मानले आहेत. पाच नक्षत्रांचा विशिष्ट कालावधी यावरून या चित्रपटाचं नाव ‘पंचक’ असं ठेवण्यात आलं आहे. ‘पंचक’ लागल्याने आता कोणाचा मृत्यू होणार याची भीती घरातील प्रत्येकाच्या मनात असल्याचं ट्रेलर पाहून लक्षात आहे.
हेही वाचा : “माझ्या नवऱ्याने…” ‘लस्ट स्टोरीज २’मधील इंटिमेट सीनबद्दल अमृता सुभाषचा खुलासा; म्हणाली, “आम्ही दोघंही…”
‘पंचक’मध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आशिष कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जयंत जठार व राहुल आवटे दिग्दर्शित ‘पंचक’ येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.