‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘हम आपके दिल में रहते है’, ‘फना’ आणि अशा अनेक चित्रपटांत काजोल(Kajol)ने काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. याबरोबरच अलीकडेच काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंगा’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘दो पत्ती’, ‘सलाम व्येंकी’ या चित्रपटांत अभिनेत्रीने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच अभिनेत्री एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री एका नवीन चित्रपटातून आणि नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर तिच्या आगामी ‘माँ’ या चित्रपटाचे आहे. या पोस्टरमध्ये एका बाजूला राक्षसी प्रवृत्तीचे डोळे दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला देवीचे डोळे दिसत आहेत. यामध्ये काजोल एका मुलीसह दिसत आहे. दोघींच्याही चेहऱ्यावर भीती चिंता दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना काजोलने लिहिले, जर इथे नरक आहे, तर देवीही आहे. पुढे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दलही अभिनेत्रीने खुलासा केला आहे. २७ जून २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे काजोलने या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘माँ’ हा चित्रपट विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केला आहे. काजोलसह या चित्रपटात अभिनेता रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरीन शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. समोर आलेल्या पोस्टरमध्ये काजोल तिच्या ऑनस्क्रीन मुलीचे संरक्षण करण्याचे प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टरवरून हा चित्रपट हॉरर असू शकतो, असे म्हटले जात आहे. काजोलच्या या नवीन चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी काजोलवर गर्व असल्याचे म्हटले आहे.

काजोलने ‘दो पत्ती’ या सिनेमात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ती अलीकडे नव्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसत आहे. ‘माँ’ चित्रपटाबरोबर अभिनेत्री ‘सरजमीन’ या चित्रपटातदेखील दिसणार आहे. इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन हेदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत. आता प्रेक्षकांना काजोलचा नवा चित्रपट भुरळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.