Kalki 2898 AD 1 Days Box Office Collection: यंदाचा बहुप्रतिक्षित व बिग बजेट चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हासन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. चित्रपटाला पहिल्याच दिवशी दमदार प्रतिसाद मिळाला आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ हा सायन्स फिक्शन चित्रपट गुरुवारी (२७ जून रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ एवढी होती की पहिल्या दिवसासाठी जबरदस्त आगाऊ बुकिंग झाली. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कल्की 2898 एडी’ने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केलं, ते जाणून घेऊया.

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
The Sabarmati Report Box Office Collection Day 1
‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ चा बहुप्रतिक्षित चित्रपट होता आणि चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे आणि या चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशीच अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ९५ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली आहे. यापैकी तेलुगूमध्ये ६४.५ कोटी रुपये, हिंदी भाषेत २४ कोटी, मल्याळम २.२ कोटी, तमिळ चार कोटी आणि कन्नड भाषेत ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल १८० कोटी रुपये कमावले आहेत.

अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? अभिनेत्री म्हणाली, “मुलगा ग्राफिक्स डिझायनर, तर मुलगी…”

‘कल्की 2898 एडी’ ने प्रभासच्याच चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स

‘कल्की 2898 एडी’ने पहिल्याच दिवशी ९५ कोटींची कमाई करून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रभासच्या चित्रपटाने त्याच्याच्या सालार – ९०.७ कोटी, साहो – ८९ कोटी आणि आदिपुरुष – ८६.७५ कोटी या चित्रपटांचे पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले आहेत. पण, हा चित्रपट ‘आरआरआर’, ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ’चे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड मोडू शकला नाही.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

‘कल्की 2898 एडी’ने बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा चित्रपट देशात ९५ कोटी कमवून यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याआधी हृतिक रोशनच्या ‘फायटर’ने पहिल्या दिवशी सर्वाधिक २२ कोटींचा गल्ला जमवला होता. दोन दिवस वीकेंड असल्याने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.