‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर १५ व्या दिवशीदेखील चित्रपटाने भारतात ६.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतात ६.७ कोटी केलेल्या कमाईपैकी, हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चार कोटींची कमाई केली असून, तेलुगू भाषेत चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ४१४.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, त्यानंतर बॉक्स ऑफिसच्या कमाईमध्ये ६९ टक्क्यांची घट होत चित्रपटाने १२८.६ कोटींचा गल्ला जमवला होता.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
arjun rampal grandfather designed first artillery gun for Indian Army
तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला चित्रपट आहे. २०२४ मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती. २०२४ मध्ये इतर भाषांतील म्हणजेच तेलुगू आणि तमिळ चित्रपटदेखील कमाल दाखवू शकले नाहीत. ‘हनुमान’ या चित्रपटाने जगभरात २९५ कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा : Anant Ambani Wedding: आकर्षक विद्युत रोषणाईने सजला अनंत-राधिकाचा लग्नमंडप, व्हिडीओ आला समोर

महत्त्वाचे म्हणजे, ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने २०२३ मध्ये गाजलेल्या चित्रपटांनादेखील मात दिली आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५४३.०५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘गदर २’ ला मागे टाकले होते. ‘गदर २’ने देशांतर्गत ५२५.४५ कोटींची कमाई केली होती. आता कल्कीने ‘पठाण’ चित्रपटाचा विक्रम मोडत देशातंर्गत ५४३.४५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, देशांतर्गत सर्वाधिक कमाई रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने केली आहे. बॉक्स ऑफिसवर ५५६.३६ कोटींचा गल्ला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने जमवला होता. आता ‘कल्की २८९८ एडी’ हा विक्रम मोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विज्ञान आणि पौराणिक कथेचा योग्य संगम असल्याचे म्हटले जात आहे. विष्णूच्या दहाव्या अवताराची ही गोष्ट आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, कमल हसन, दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर, विजय देवरकोंडा अशा दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Story img Loader