‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर १५ व्या दिवशीदेखील चित्रपटाने भारतात ६.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतात ६.७ कोटी केलेल्या कमाईपैकी, हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चार कोटींची कमाई केली असून, तेलुगू भाषेत चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ४१४.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, त्यानंतर बॉक्स ऑफिसच्या कमाईमध्ये ६९ टक्क्यांची घट होत चित्रपटाने १२८.६ कोटींचा गल्ला जमवला होता.
‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला चित्रपट आहे. २०२४ मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली होती. २०२४ मध्ये इतर भाषांतील म्हणजेच तेलुगू आणि तमिळ चित्रपटदेखील कमाल दाखवू शकले नाहीत. ‘हनुमान’ या चित्रपटाने जगभरात २९५ कोटींची कमाई केली होती.
हेही वाचा : Anant Ambani Wedding: आकर्षक विद्युत रोषणाईने सजला अनंत-राधिकाचा लग्नमंडप, व्हिडीओ आला समोर
महत्त्वाचे म्हणजे, ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने २०२३ मध्ये गाजलेल्या चित्रपटांनादेखील मात दिली आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५४३.०५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘गदर २’ ला मागे टाकले होते. ‘गदर २’ने देशांतर्गत ५२५.४५ कोटींची कमाई केली होती. आता कल्कीने ‘पठाण’ चित्रपटाचा विक्रम मोडत देशातंर्गत ५४३.४५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, देशांतर्गत सर्वाधिक कमाई रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने केली आहे. बॉक्स ऑफिसवर ५५६.३६ कोटींचा गल्ला ‘अॅनिमल’ चित्रपटाने जमवला होता. आता ‘कल्की २८९८ एडी’ हा विक्रम मोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट विज्ञान आणि पौराणिक कथेचा योग्य संगम असल्याचे म्हटले जात आहे. विष्णूच्या दहाव्या अवताराची ही गोष्ट आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, कमल हसन, दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर, विजय देवरकोंडा अशा दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.