अभिनेत्री कल्की कोचलिनने तिच्या लक्षवेधी अभिनयाने अनेकांची मने जिंकली. ‘ये जवानी है दिवानी’, ‘एक थी डायन’, ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कल्कीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती ‘मेड इन हेवन’च्या दुस-या पर्वात झळकणार आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने वैयक्तिक आणि चित्रपटसृष्टीतील संघर्षाबाबत भाष्य केले.
हेही वाचा : ‘बिग बॉस’नंतर अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने पहिल्यांदाच केले ऑनस्क्रीन एकत्र काम, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री कल्की कोचलिन ‘मेल फेमिनिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मला बालपणापासूनच माझ्या गोऱ्या रंगामुळे प्रचंड भेदभावाचा सामना करावा लागला. मी ड्रग्ज घेते म्हणून जास्त गोरी आहे असे अनेकांना वाटते. ही मुलगी ड्रग्ज व्यसनाधीन आहे असा अनेकांचा गैरसमज झाला होता. पण, जेव्हा मी तामिळ भाषेत संवाद साधायचे तेव्हा लोक माझ्याशी नीट वागायचे.”
हेही वाचा : Video : भर कार्यक्रमात आलिया भट्ट विसरली संवाद, रणवीर सिंह चेष्टा करत म्हणाला, “आता माझ्याकडे…”
चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत सांगताना कल्की पुढे म्हणाली, “एका निर्मात्याने मला खूप चांगली भूमिका देतो असे सांगून रात्री जेवायला भेट असे सांगितले होते. पण, त्याचा प्रस्ताव मी स्वीकारला नाही.” अभिनेत्रीने हा अनुभव सांगताना कोणाचेही नाव घेतलेले नाही.
हेही वाचा : “मी बाबांच्या बाजूला बसून…” ‘बाईपण भारी देवा’ बघितल्यानंतर ‘अशी’ होती सोहम बांदेकरची प्रतिक्रिया, म्हणाला..
“काही जणांनी तुझे दात जरा जास्त मोठे आहेत असे मला सांगतिले होते. तर, एका मेकअप आर्टिस्टने माझ्या डोळ्यांवर आयलाइनर लावण्यास नकार दिला होता.” असे अनेक अनुभव मला या इंडस्ट्रीमध्ये आले असल्याचे कल्कीने सांगितले. दरम्यान, अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच ‘मेड इन हेवन’च्या दुसऱ्या सीझनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.