बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री मोठा संघर्ष करीत काम मिळवतात. या कलाकारांना जोपर्यंत बॉलीवूडमध्ये मोठा ब्रेक मिळत नाही तोपर्यंत ते सामान्य माणसांप्रमाणेच आयुष्य व्यतीत करतात. काही कलाकारांना तर पहिला सिनेमा यशस्वी होऊनसुद्धा पुढच्या सिनेमा मिळेपर्यंत मोठा काळ निघून जातो. अभिनेत्री कल्की कोचलीनच्या बाबतीतही असेच घडले. कल्की कोचलीनने अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले. मात्र, त्या कौतुक आणि प्रसिद्धीनंतरही कल्कीला पुढची दोन वर्षे कोणताही चित्रपट मिळाला नाही. या काळात तिने खूप संघर्ष करीत दिवस काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या या प्रवासाबद्दल खुलासा केला आणि आर्थिक गरजांसाठी काही विशिष्ट प्रकारची कामे निवडल्याबद्दलही सांगितले. ऑल अबाऊट ईवच्या ‘आफ्टर अवर्स’ या शोमध्ये बोलताना कल्कीने सांगितले की, तिच्या व्यावसायिक आयुष्यातला पहिला मोठा संघर्ष ‘देव डी’नंतर सुरू झाला. तिने सांगितले, “‘देव डी’नंतर तब्बल दोन वर्षे मला कोणताही चित्रपट मिळाला नाही. मला मिळालेला पुढचा चित्रपट ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ होता.” या काळात तिने एका नाटकात काम केले; ज्यासाठी तिला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीने ९० च्या दशकात केलेलं बोल्ड फोटोशूट; आईने पाहिल्यावर केलेलं असं काही की…, तिनेच केला खुलासा

जेव्हा तिला विचारण्यात आले की, या काळात तिने आर्थिक व्यवस्थापन कसे केले, तेव्हा कल्कीने (Kalki Koechlin)सांगितले, “मी वडापाव खाऊन आणि लोकल ट्रेनने प्रवास करून हा काळ निभावला.”

कल्कीने तिच्या प्रतिमेबद्दल सांगितले, “लोकांना ती फार यशस्वी असल्याचे वाटते; पण ती प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी यशस्वी आहे.” ती म्हणाली, “लोक मला ओळखतात. त्यांना माझा चेहरा परिचित आहे; पण जेव्हा ते मला लोकल ट्रेनमध्ये पाहतात, तेव्हा त्यांना धक्का बसतो. ते म्हणतात, “तुझ्याबरोबर बॉडीगार्ड का नाहीये?” हा फार मोठा विरोधाभास आहे. खऱ्या आयुष्यात मी लोकांना खूप यशस्वी वाटते; पण प्रत्यक्षात मी इतकी यशस्वी नाहीये.”

हेही वाचा…यामी गौतमच्या सहा महिन्यांच्या मुलाची पहिली झलक आली समोर, पती आदित्य धर पोस्ट शेअर करत म्हणाला…

कल्कीने पुढे सांगितले, “तिने चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या दिवसांपासून खूप मोठा प्रवास केला आहे. कल्की काही कामे केवळ पैशांसाठीच करते.” ती म्हणाली, “काही गोष्टी मी फक्त पैशासाठी करते.” त्यामध्ये ती प्रामुख्याने कॉर्पोरेट कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. ती म्हणाली, “तिथे मला माहीत असतं की, हा फक्त देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. तिथे त्यांना माझा चेहरा हवा असतो आणि मला पैसे,” असे कल्कीने नमूद केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalki koechlin reveals on struggles after debut in bollywood psg