‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी ‘जवान’चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. टीझरनंतर नुकताच किंग खानच्या या बहुचर्चित जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या प्रिव्ह्यू ट्रेलरला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. या नव्या टीझरमध्ये बरेच अॅक्शन सीन्सही पाहायला मिळाले आहेत.

‘जवान’ चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘जवान’ हा कमाईच्या बाबतीत ‘पठाण’लाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ‘जवान’ जबरदस्त कमाई करेल असं ट्रेड एक्स्पर्टचं मत आहे.

abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shah Rukh Khan Emotional On Swades Act
Video : लेकाच्या शाळेत २० वर्षांपूर्वीचं ‘ते’ एव्हरग्रीन गाणं ऐकून भावुक झाला शाहरुख खान! व्हिडीओ व्हायरल
Bollywood actor Shahrukh khan wear 63000rd Hermes necklace at son abram school annual function
Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”
Union Home Minister Amit Shah is determined to make the country free from Naxalism within a year and a half print politics news
देश सव्वा वर्षात नक्षलवादमुक्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार
Amit Shah On Eknath Shinde
Amit Shah : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान
Azam Khan
Azam Khan : आझम खान यांचं तुरुंगातून एक पत्र अन् सपा-काँग्रेस संबंधाला ग्रहण? पत्रात कोणता राजकीय बॉम्ब फोडला?

आणखी वाचा : “संपूर्ण बॉलिवूड ‘गदर’च्या विरोधात होतं…” सनी देओलने सांगितलं यामागील खरं कारण

प्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके यानेही याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे. केआरकेच्या सर्वेनुसार तो त्याच्या ट्वीटमध्ये लिहितो, “जवान हा चित्रपट पाहण्यासाठी ७९% लोक उत्सुक आहेत. याचाच अर्थ हा चित्रपट पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई भारतात तर १२५ कोटींची कमाई जगभरात करू शकतो.”

पुढे याबद्दल केआरकेने आणखी एक ट्वीट करत लिहिलं, “जर शाहरुख खानच्या ‘जवान’ने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली तर अजय देवगण, अक्षय कुमार, आमिर खान, हृतिक यांना पुढचा आठवडाभर तरी झोप येणार नाही.” दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून अ‍ॅटलीला ओळखले जाते. दिग्दर्शक अ‍ॅटली ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली असून सहनिर्माता गौरव वर्मा आहे.

Story img Loader