२ दशकापूर्वीच्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच कलाकारांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ‘गदर २’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यानंतर एका बॉलीवूड अभिनेत्याने या चित्रपटाबाबत मोठा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका सैफ अली खानला नव्हे तर ‘या’ बॉलीवूड सुपरस्टारला केली होती ऑफर; अभिनेत्याने भूमिका नाकारली कारण…

अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरके सोशल मीडियावर सक्रिय राहून खळबळजनक ट्वीट करत असतो. आताही केआरकेने ‘गदर २’संदर्भात केलेले एक ट्वीट खूप व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये केआरके लिहितो, “‘गदर २’ची संपूर्ण टीम आज ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचली आहे. ‘गई भैंस पानी में’ आता हा चित्रपट सुद्धा ब्लॉकडस्टर होणार” अर्थात केआरकेने ‘गदर २’चित्रपट फ्लॉप होईल अशी भविष्यवाणी केली आहे.

हेही वाचा : “आधी लगीन कोंढाण्याचं, मग…” बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, संवाद ऐकून शिवप्रेमी भारावले

केरआरके दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहितो की, “मी वारंवार सांगत आलोय आता पुन्हा सांगतो ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन होत असेल तर याचा अर्थ तो चित्रपट नक्कीच फ्लॉप होतो. जर लोक कपिलच्या फायद्यासाठी त्याचा चित्रपट पाहत नसतील, तर कपिलच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे चित्रपट का पाहतील? कपिल चित्रपटांसाठी पनौती आहे.”

हेही वाचा : “खिशात मोजकेच पैसे, उपाशीपोटी काम, लंगर खाऊन पोट भरलं” फर्जंद फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय प्रवास, म्हणाला…

दरम्यान, ‘द कपिल शर्मा’ शो हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. दर आठवड्याला सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याठिकाणी जातात. कपिल शर्मा शेवटचा ‘झ्विगाटो’ चित्रपटात झळकला होता, या चित्रपटात त्याने डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan aka krk tweets gadar 2 will be flop because of kapil sharma show sva 00