विकी कौशल, रणवीर सिंग, अजय देवगण हे अभिनेते बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये सामील आहेत. गेली अनेक वर्ष ते अनेक उत्तमोत्तम चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या तिघांचाही चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक होत असतानाच दुसरीकडे आता एका अभिनेता-चित्रपट समिक्षकाने ते कधीही बॉलीवूडमधील सुपरस्टार होऊ शकत नाहीत असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
या तिघांवर टीका करणारा अभिनेता, निर्माता, चित्रपट समीक्षक म्हणजे कमाल आर खान. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा सतत चर्चेत असतो. जवळपास रोजच तो काहीतरी वादग्रस्त ट्वीट त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून करत असतो. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल, त्यातील कलाकारांबद्दल कमाल आर खानने टीका केली. तर आता त्याने अजय, रणवीर आणि विकीवर निशाणा साधला आहे.
केआरके ने आज एक ट्वीट केलं आणि लिहिलं, “तुम्हाला माहित आहे का की, अजय देवगण, रणवीर सिंग आणि विकी कौशल सुपरस्टार का होऊ शकत नाहीत? कारण ते बॉलीवूड हिरोसारखे दिसण्याऐवजी दक्षिणात्य चित्रपटातील हिरोसारखे दिसतात.” आता त्याचे हे ट्वीट खूपच चर्चेत आलं आहे. त्याच्या या ट्विटवर कमेंट करत नेटकरी अजय, विकी आणि रणवीरची बाजू घेत केआरकेलाच खडे बोल सुनावत आहेत.
हेही वाचा : “रवीना टंडनला पद्मभूषण देणं म्हणजे…” ‘त्या’ ट्वीटमुळे प्रसिद्ध निर्माता ट्रोल
या ट्वीटवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुला काय म्हणायचंय? दक्षिणात्य हिरो सुपरस्टार नसतात? तू रजनीकांत यांना विसरला आहेस का? ते सुपरस्टार आहेत. तुझी ही बडबड बंद कर.” तर आणखी एकाने लिहिलं, “तू विसरू नकोस अजय देवगणला ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तो आधीच सुपरस्टार झाला आहे. तूच एक चित्रपट करत स्वतःला सुपरस्टार म्हणवतोस.”