साऊथचे सुपरस्टार कमल हसन आज (७ नोव्हेंबर) आपला ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथ चित्रपटांबरोबर कमल यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. बॉलीवूडमध्ये कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी चांगलीच गाजली. श्रीदेवी यांचे नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडले गेले होते. पण श्रीदेवी यांच्या आईची इच्छा होती की श्रीदेवी आणि कमल हसन यांच लग्न व्हाव. पण कमल हसन यांनी या गोष्टीसाठी नकार दिला होता. एका कार्यक्रमामध्ये कमल हसन यांनी यामागचे कारण सांगितले होते.
कमल हसन यांनी एकदा सांगितले होते की, ते आणि श्रीदेवी एकमेकांच्या खूप जवळ होते. श्रीदेवींची आई वारंवार कमल हसन यांना श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्यासाठी विचारत होत्या. पण कमल हसन प्रत्येक वेळी त्यांना नाही म्हणायचे. यामागे त्यांनी कारणही दिले होते. कमल हसन म्हणाले होते की, “श्रीदेवींची आई आणि मी अनेकदा श्रीदेवीच्या लग्नाबाबत बोलायचो. तेव्हा त्या मला गंमतीने माझ्या मुलीशी लग्न कर म्हणायच्या. मी हसून म्हणायचो की असं झालं तर मी आणि श्रीदेवी एकमेकांना वेडे बनवू आणि मग दुसऱ्या दिवशी मला तिला घरी परत पाठवावे लागेल.”
हेही वाचा- ‘टायगर ३’साठी सलमान खानने किती मानधन घेतले माहीत आहे का? आकडा वाचून व्हाल थक्क!
कमल हसन आणि श्रीदेवी यांची पहिली भेट १९७६ मध्ये ‘मूंद्रू मुदिचू’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा श्रीदेवी १३ वर्षांच्या होत्या. त्यांनी नुकतेच चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. कमल हसनही त्यावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. कमल हसन श्रीदेवींना अभिनय शिकवायचे. हळूहळू कमल हसन आणि श्रीदेवी यांची मैत्री झाली. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात त्यांनी रोमँटिक सीन देखील केले होते. त्यांच्या दोघांमधील वाढती जवळीक पाहता ते एकमेकांशी लग्न करतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण तस काहीच झालं नाही.
हेही वाचा- अभिनय सोडणं, आमिर खानकडून मार्गदर्शन याबद्दल दर्शिल सफारीचं वक्तव्य; म्हणाला, “लोकांचा गैरमसज…”
कमल हसन यांनी एका कार्यक्रमात श्रीदेवी यांच्याबरोबर असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. कमल हसन श्रीदेवीला कुटुंबातील सदस्य मानत होते. त्यांच्यात आणि श्रीदेवींमध्ये भाऊ-बहिणीचं नातं होतं. श्रीदेवी कमल हसन यांचा खूप आदर करत आणि त्यांना नेहमी ‘सर’ म्हणत. आनंद विकतन या तामिळ मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात कमल हसन यांनी श्रीदेवीसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्यही केलं होते.