अभिनेत्री रवीना टंडन ही केली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आली आहे. जवळपास गेले तीन दशकांकडून अधिक काळातील मनोरंजन सृष्टीत काम करत आहे. तिच्या या कारकिर्दीत तिने आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. मनोरंजसृष्टीत तिने दिलेल्या योगदानाबद्दल नुकताच तिला भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला. पण आता तिला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एका निर्मात्याने टीका केली आहे. परंतु या निर्णयावर टीका करताना त्याने पद्मश्रीच्या ऐवजी पद्मभूषण असं लिहिल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे.

२५ जानेवारी रोजी भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या यादीत रवीना टंडन असेही नाव सामील होते. तिला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. तिला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही नाही तिचं कौतुक केलं तर हा पुरस्कार देण्यासाठी ती पात्र नाही असं म्हणत अनेकांनी या निर्णयाला असहमती दाखवली. आता कमाल आर खान यानेही याबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?

आणखी वाचा : “तो मला रक्ताने पत्र लिहायचा…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा

कमाल आर खान म्हणजेच केआरके सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहून त्याला पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करत असतो. आता रवीनाला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबाबत त्याने एक ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं, “रवीना टंडन हिला यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार मिळणार आहे, जिने ‘टिप टिप बरसा पानी’ सारखं गाणं केलं आहे. पद्मभूषण पुरस्कार म्हणजे गंमत आहे का?”

हेही वाचा : “…म्हणून प्रत्येक गाडीची नंबर प्लेट सारखीच,” रवीना टंडनने अनेक वर्षांनी केले गुपित उघड

रवीनाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे पण केआरकेने ट्वीटमध्ये चुकून पद्मश्रीच्या ऐवजी तिला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे असं म्हटल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे. या ट्वीटवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “रवीनाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मभूषण नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण यांमध्ये भरपूर फरक आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुझं ज्ञान कमी पडत आहे. तिला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.” तर अनेक नेटकरांनी या ट्वीटवर कमेंट करत त्याला त्याची चूक सुधारण्यास सांगितली. त्यामुळे आता केआरकेचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे.

Story img Loader