आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच KRK हा सतत चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. दर दिवशी तो काहीतरी वादग्रस्त ट्वीट त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून करत असतो. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल, त्यातील कलाकारांबद्दल कमाल आर खानने टिका केली. आता कमालने आयुष्यमान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ चितरपटावर त्याचं मत मांडलं आहे. ‘डॉक्टर जी’ला अत्यंत वाईट चित्रपट म्हणण्याबरोबरच केआरकेने आयुष्मान खुरानाच्या करिअरवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आणखी वाचा : अभिनेते मनोज जोशी ‘एअर इंडिया’वर संतापले; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला राग, नेमकं घडलं काय?
आयुष्मान खुराना हा मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. याआधीच्या सगळ्याच चित्रपटांमधून काही ना काही संदेश दिला गेला आहे. आता त्याचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा एका पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञाची कथा आहे. केआरकेने रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला वाईट म्हटले आहे. केआरकेने ट्विट करून हे भाष्य केलं आहे.
केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, “चित्रपटाच्या मीडिया पार्टनर आणि छोट्या चित्रपट समीक्षकांनीही ‘डॉक्टर जी’ला १-२ स्टार्स दिले आहेत. त्यामुळे आता तुम्ही अंदाज लावू शकता की हा चित्रपट किती वाईट आहे! मी काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो हा, आयुष्मान खुरानाचे करिअर पूर्णपणे संपले आहे. संपला आणि आज ते सिद्ध झालं. हा त्याचा सलग ५ वा फ्लॉप चित्रपट आहे.”
हेही वाचा : चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुष्मान एका स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह रकुल प्रीत सिंग, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा असे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्यमानने ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची (Gynecologist) व्यथा मिश्कीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.