या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ‘आदिपुरुष’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास राम, क्रिती सेनन हे सीतेच्या भूमिकेत तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ वाढली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ओपनिंग आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेने या चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली आहे. केआरकेने ट्वीट करीत ‘आदिपुरुष’ पहिल्याच दिवशी १५० कोटींहून अधिक कमाई करेल असे म्हटले आहे.

कमाल रशीद खानने ट्वीटमध्ये लिहिले आहे, ‘रिपोर्ट्सनुसार ‘आदिपुरुष’ फक्त भारतातच पहिल्या दिवशी १५० कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो. पहिल्या आठवड्यात १००० कोटींची कमाई करू शकेल.’ केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणारे प्रेक्षक या ट्वीटवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- उर्वशी रौतेलाने कान्स महोत्सवात घातला मगरीच्या डिझाईनचा नेकलेस; तब्बल ‘एवढे’ कोटी आहे किंमत

‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमानाच्या लूकवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा त्याच्या ‘व्हीएफएक्स’वर काम करण्यात आले आहे. ‘आदिपुरुष’च्या धमाकेदार ट्रेलरला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब अकाउंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.