‘कांतारा’ चित्रपटाची चर्चा आजही सुरु आहे. जगभरात या चित्रपटाने २५० कोटी रुपयांचा गल्ला जमावला. अभिनेता रिषभ शेट्टीनेच या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. तसेच चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं. अनेक दिग्गज कलाकरांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर रिषभचं कौतुक केलं. सुपरस्टार रजनीकांत यांनीही रिषभचा चित्रपट पाहून ‘कांतारा’ उत्तम असल्याची प्रतिक्रिया दिली. आता रिषभला बॉलिवू़ड चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.
आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?
रिषभ शेट्टीला बॉलिवूड चित्रपटांची ऑफर
‘कांतारा’ रिषभसाठी अगदी लकी ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने म्हटलं की, “बॉलिवूड चित्रपटांसाठी मला ऑफर येऊ लागल्या आहेत. पण सध्यातरी मी फक्त कन्नड चित्रपटांमध्येच काम करू इच्छितो.”
पुढे तो म्हणाला, “मी अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम करतो. इतकंच नव्हे तर सलमान खान, शाहिद कपूर सारखे तरुण कलाकारही मला आवडतात.” पण सध्यातरी रिषभने बॉलिवूड चित्रपट करण्यास नकार दिला आहे. तो दाक्षिणात्य चित्रपटांकडेच लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
आणखी वाचा – Photos : अभिनेत्रीच्या घरी पोहोचली राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची पत्रिका, डिझाईन आहे फारच खास
३० सप्टेंबरला ‘कांतारा’ प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेला असला तरी याची चर्चा कायम आहे. ‘कांतारा’ ऑस्करला पाठवण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात होती. इतकंच नव्हे तर अजय देवगण व अक्षय कुमारच्या चित्रपटांचे शो कमी करत ‘कांतारा’ला स्क्रिन देण्यात आले.