बॉलीवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौत आज ‘चंद्रमुखी २’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जवळपास दीड वर्षांनंतर कंगना ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर परतली आहे. आज ‘चंद्रमुखी २’ बरोबर ‘फुकरे ३’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कंगनाचा चित्रपट बाजी मारणार का? हे येत्या काळातच समजेल. पण त्यापूर्वी कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ चित्रपट एचडीमध्ये लीक झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
two wheeler rider senior citizen injured due to Manja
पुणे : जीवघेण्या नायलाॅन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जखमी
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral

२००५ साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘चंद्रमुखी २’चा सीक्वल कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ चित्रपट आहे. पी वासू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात राघव लॉरेंस, राधिका सरथकुमार, वादिवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण प्रदर्शित होऊन एक दिवस पूर्ण न होताच चित्रपट लीक झाला आहे.

हेही वाचा –“तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले…

एका पायरेटेड वेबसाइटनं ‘चंद्रमुखी २’ चित्रपट लीक केला आहे. एचडीमध्ये चित्रपट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे याचा कंगनाच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे. ‘चंद्रमुखी २’ चित्रपट लीक होण्याची पहिलीच घटना नसून यापूर्वीच बरेच चित्रपट अशाप्रकारे लीक करण्यात आले आहेत.

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०२२मध्ये तिचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी कंगना ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर ती ‘तेजस’ आणि ‘इमरजेंसी’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader