एखाद्या विषयावर बिनधास्तपणे आपलं मत मांडणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे कंगना रणौत. कंगना प्रत्येक विषयावर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. इन्स्टाग्राम, ट्वीटरद्वारे ती आपलं मत व्यक्त करताना दिसते. बॉलिवूडमधील घराणेशाही असो वा एखादा राजकारणाचा विषय कंगना या वादामध्ये सहभागी होताना दिसते. आताही तिने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण तिचं हे नेमकं ट्वीट काय? याबाबत जाणून घेऊया.
कंगनाने शॉर्ट पँट परिधान करुन मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुलील ट्विटरद्वारे सुनावलं आहे. एका युजरने शॉर्ट कपडे परिधान करुन मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुलीची फोटो ट्वीट केले. तसेच याला विरोध दर्शवला. कंगनाने या युजरचे ट्वीट रिट्विट करत तिचं मत मांडलं आहे. तसेच वेस्टर्न कपडे परिधान करुन कंगनाही एकदा एका मंदिरात गेली होती. त्यादरम्यान नेमकं काय घडलं होतं? याबाबतही तिने भाष्य केलं.
कंगना म्हणाली, “हे वेस्टर्न कपडे आहेत. हे कपडे इंग्रजांनी तयार केले आणि याची सगळीकडे प्रसिद्धी केली. एकदा मी वॅटिकन (इरोपमधील शहर) इथे होते. मी शॉर्ट पँट व टी-शर्ट परिधान केलं होतं. पण तेथील मंदिरामध्ये अशा कपड्यांत प्रवेश करण्यास मला मनाई करण्यात आली. मी हॉटेलमध्ये जाऊन कपडे बदलले. नाइट ड्रेस परिधान करणारी ही मुलगी आळशी व विचित्र आहे. अशा मुर्खांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला पाहिजे”.
कंगनाने विचित्र कपडे परिधान करुन मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुलींबाबत संताप व्यक्त केला आहे. कंगनाने शेअर केलेले हे फोटो हिमाचल येथील बैजनाथ मंदिरातील आहे. कंगनाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी ती जे बोलत आहे ते चुकीचं आहे असं म्हटलं आहे.