Kangana Ranaut Approves Aryan Khan : शाहरुख खानने मंगळवारी आर्यन खानबद्दल मोठी घोषणा केली. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट यांच्या भागीदारीतून २०२५ मध्ये एक बॉलीवूड सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या निमित्तानं आर्यन खान क्रिएटर व दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार आहे. तर, या सीरिजची निर्मिती गौरी खान करणार आहे. आर्यन खानच्या कामाची ही अपडेट मिळाल्यानंतर सर्वांनीच त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. त्यात आता स्टार किड्सवर खरमरीत शब्दांत मत व्यक्त करणाऱ्या कंगना रणौतनेही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगनाकडून आर्यन खानचं कौतुक

कंगनाला ही माहिती समजल्यावर तिनं आर्यन खानचं कौतुक केलं आहे. कंगनानं यासाठी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, चित्रपटांचा वारसा असलेल्या कुटुंबातील मुलं काहीतरी वेगळं करीत आहेत. नेहमीप्रमाणे मेकअप, वजन कमी करणं आणि बाहुलीसारखं सजून राहण्यापेक्षा मुलं वेगळं काही करत आहेत, हे फार छान आहे.

हेही वाचा : ए आर. रेहमान यांच्यानंतर बासवादक मोहिनी डेही घेणार घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली, “आम्ही दोघेही एकमेकांचे…”

“आपण सर्वांनी एकत्र मिळून भारतीय सिनेसृष्टीचा दर्जा उंचावण्यासाठी काम केलं पाहिजे. कारण- ही आता काळाची गरज आहे. ज्यांच्याकडे मनोरंजन विश्वात येण्यासाठी सर्व मार्ग उपलब्ध असतात, ते शक्यतो सोपे मार्ग स्वीकारतात. मात्र, आर्यनने अभिनयाव्यतिरिक्त वेगळा मार्ग निवडला आहे. त्यानं जो मार्ग निवडला आहे, तो फार कमी व्यक्ती निवडतात. आपल्याला आता कॅमेऱ्यामागे चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींची फार गरज आहे. आर्यनला लेखक आणि आणि चित्रपट निर्माता म्हणून पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे”, असं कंगनाने आपल्या स्टोरीमधून सांगितलं आहे.

शाहरुख खानने मंगळवारी आर्यनच्या पदार्पनाची माहिती देताना पोस्ट शेअर करत लिहिलं की, आम्ही Netflix बरोबर एक नवीन सीरिज सादर करत आहोत. ही एक सिनेमॅटिक सीरिज असून सिनेजगतात अभुतपूर्व अनुभूती देणारणार आहे. आर्यन आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्यावतीने याची निर्मिती करण्यात आली आहे. ही सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल.

पुढे शाहरुखने आपल्या मुलाल एक मोलाचा सल्लादेखील दिला आहे. त्यानं म्हटलं, “आर्यन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आता तयार हो. हे काम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव की, मनोरंजनासारखा दुसरा चांगला व्यवसाय कोणताच नाही.”

हेही वाचा :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता लंडनमध्ये! तिकीट कधी अन् कुठे बुक करायचं?

आर्यनबद्दल ही माहिती मिळाल्यावर त्याचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही आर्यन खानचं कौतुक केलं आहे. तर, गौरी खानची जीवलग मैत्रीण भावना पांडे आणि महीप कपूर, शालिनी पासी यांनीही आर्यनचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut appreciation and approves aryan khans first project as a director and producer rsj