अनुष्का शर्मा आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिने उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र सध्या अनुष्का करण जोहरच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. करणचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करणने अनुष्काबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. आता करणच्या या व्हायरल व्हिडीओनंतर कंगना रणौतने त्याच्याविरोधात विधान केलं आहे.
काय म्हणाला होता करण जोहर?
करण म्हणाला होता की, “मला अनुष्का शर्माचं करिअर पूर्णपणे संपवायचं होतं. यामागचं कारण म्हणजे जेव्हा आदित्य चोप्राने मला तिचे फोटो दाखवले होते तेव्हा मी म्हटलं होतं की, अनुष्काला चित्रपटासाठी साईन करण्याची काहीच गरज नाही. कारण तेव्हा माझ्या ओळखीत असलेल्या एका अभिनेत्रीला आदित्यने साईन करावं अशी माझी इच्छा होती”. करणचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
‘बँड बाजा बारात’ चित्रपटामध्ये अनुष्काचा अभिनय पाहून तिचं कौतुक करावं, तसेच तिची माफीही मागावी असं मला नंतर वाटलं, असंही करण म्हणाला होता. पण करणच्या या व्हिडीओनंतर कंगना भलतीच भडकली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे करणचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला. तसेच एक विधानही केलं.
आणखी वाचा – “आता माझे वडील नाहीत पण…” आकाश ठोसरने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या आईने…”
कंगना म्हणाली, “या चाचा चौधरी फक्त हे एकच काम आहे”. कंगना करणबाबत नेहमीच खुलेपणाने बोलताना दिसते. घराणेशाहीचा आरोप असो वा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अभिनेत्रींची निवड असो प्रत्येक विषयांवर ती भाष्य करताना दिसते. आता पुन्हा एकदा तिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.