बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा प्रियांकाने केला आहे. याबाबत आता कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौतने भाष्य केले आहे. प्रियांकाच्या बॉलिवूड सोडून जाण्यामागे कंगनाने चित्रपट निर्माता करण जोहरला जबाबदार धरले आहे. याबाबत ट्वीट करत कंगनाने करणवर पुन्हा निशाणा साधला आहे.
कंगना रणौतने ट्विटरच्या माध्यमातून करण जोहरवर गंभीर आरोप केले आहेत. करण जोहरने प्रियांका चोप्रावर बॉलिवूडमध्ये बंदी घातली होती. त्यामुळेच तिला भारत सोडून जावं लागलं असा दावा कंगनाने केला आहे. रनौत यांनी चित्रपट निर्मात्याकडून बाहेरील लोकांना त्रास दिल्याबद्दल बोलले आहे. अलीकडेच प्रियांकाने एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता असं प्रियांका म्हणाली.
प्रियांकाच्या या स्पष्टीकरणानंतर कंगनाने ट्विट करत भाष्य केले आहे. कंगनाने लिहिले की प्रियांका चोप्राला बॉलीवूडबद्दल हेच म्हणायचे आहे, लोकांनी तिच्या विरोधात ग्रुप बनवला होता. तिला धमक्या दिल्या आणि तिला फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर काढले. एका सेल्फ मेड महिलेला भारत सोडण्यास भाग पाडले गेले. करण जोहरने तिच्यावर बंदी घातली हे सर्वांना माहीत आहे.” कंगनाने हे ट्वीट प्रियांकाला टॅगही केले आहे.
कंगनाने पुढे लिहिले आहे की, “मीडियाने करणसोबत मिळून प्रियांकाबद्दल मनात येईल ते काहीही लिहिले कारण तिची शाहरुख खानसोबत चांगली मैत्री होती. नेहमीच अशा आउटसाइडर्सच्या शोधात असणाऱ्यांना प्रियांकाच्या रुपात पंचिंग बॅग मिळाली. या लोकांनी प्रियांकाला इतका त्रास दिला की शेवटी तिला भारत सोडावा लागला.’
हेही वाचा- प्रियंका च्रोपाने चिमुकल्या लेकीला दिल्या मेकअप टिप्स? फोटो शेअर करत म्हणाली…
कंगना रणौतने करण जोहरला बॉलिवूडमध्ये ‘बाहेरील लोकांना त्रास देण्यासाठी’ ‘जबाबदार’ धरण्याची मागणी केली. “या घृणास्पद, मत्सरी, क्षुद्र आणि विषारी व्यक्तीला फिल्म इंडस्ट्रीची संस्कृती आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे. ज्याने अभिषेक बच्चन किंवा शाहरुख खानच्या काळात बाहेरच्या लोकांचे स्वागत केले नाही. त्याच्या टोळी आणि माफिया पीआरवर छापे टाकून बाहेरील लोकांना त्रास दिल्याबद्दल त्याला जबाबदार धरले पाहिजे. ” असे ट्वीट करत कंगनाने करणवर निशाणा साधला आहे.