Kangana Ranaut Comment on Rahul Gandhi about film Emergency: अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ येत्या ६ प्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौत सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. कंगना यांचा लोकसभा निवडणूक जिंकून भाजपाच्या खासदार झाल्यावर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.

कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie) चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्या रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या शोच्या आगामी भागात दिसणार आहेत. या शोची प्रोमो क्लिप एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर कंगना रणौत यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपट आणीबाणी आणि भारताच्या माजी पंतप्रधान व राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

“…ही इंदिरा गांधींच्या आयुष्यातून मला मिळालेली मोठी शिकवण”, कंगना रणौत यांचं भाष्य; आगामी चित्रपटावर मांडली भूमिका!

…तर त्यांना माझा चित्रपट कसा समजेल- कंगना रणौत

शोमध्ये कंगना यांना प्रश्न विचारण्यात आला की राहुल गांधींना ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट आवडेल का? त्यावर त्यांनी आधी प्रेक्षकांकडे पाहिलं आणि मग म्हणाल्या, “जर ते घरी जाऊन टॉम अँड जेरी कार्टून पाहत असतील तर त्यांना माझा चित्रपट कसा समजेल.”

“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

दरम्यान, ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. जेव्हा तुम्ही इंदिरा गांधींवर बायोपिक करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती का? तुम्ही व राहुल गांधी विविध वक्तव्ये करत असता तर या गोष्टी आडव्या आल्या का? म्हणजे तुम्ही हा बायोपिक कसा केला कारण तो खूपच अवघड आहे. यावर “हो, बायोपिक करणं खूप अवघड होतं, इंदिरा गांधी यांचं आयुष्यही खूप चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांची सर्व माहिती घेण्याचे सर्व अधिकार माझ्याकडे होते. पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिराजींचे चरित्र राजीव गांधी यांनी लाँच केले होते. त्यावरच हा चित्रपट केला आहे. त्यामुळे राहुल गांधींना हा बायोपिक पाहून खूप आनंद होईल, किंबहुना त्यांना हा चित्रपट पाहून अभिमान वाटेल, असं मला वाटतं,” असं कंगना रणौत म्हणाल्या होत्या.

Kangana Ranaut on if Rahul Gandhi will like Emergency
‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे पोस्टर (फोटो – कंगना रणौत इन्स्टाग्राम)

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार यात झळकणार आहेत. एका आठवड्याने म्हणजेच ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader