अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी रोजी फहाद अहमदबरोबर तिच्या लग्नाची घोषणा केली. तिने आधी रजिस्टर्ड मॅरेज केलं, नंतर एंगेजमेंट केली. स्वराने लग्नाबद्दल घोषणा करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. दिव्या दत्ता आणि सोनम कपूर यांनी तिच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. बॉलिवूडमधील कलाकारांसह चाहते स्वराला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वरा भास्करने साखरपुड्यात नेसली आईच्या लग्नातील साडी; ४० वर्षे जुन्या साडीचा फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री कंगना रणौतनेही स्वराला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रणौतने तिच्या ट्विटर हँडलवरून स्वरा व फहादचं अभिनंदन केलं. ती म्हणाली, “तुम्ही दोघेही खूप आनंदी दिसत आहात. ही देवाची कृपा आहे. लग्नं मनाने होतात, बाकी सर्व औपचारिकता असतात.”

कंगनाने स्वराच्‍या ट्वीटला प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले. तसेच स्‍पेशल मॅरेज अ‍ॅक्टमुळे ती आणि फहाद विवाह करू शकत असल्याचंही ती म्हणाली. “स्पेशल मॅरेज अॅक्टसाठी चीअर्स. (नोटीस पिरियड इत्यादी गोष्टी असूनही) किमान ते आहे आणि त्यामुळे प्रेमाला संधी मिळते. प्रेम करण्याचा अधिकार, तुमचा जीवन साथीदार निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, एजन्सीचा अधिकार हे विशेषाधिकार नसावेत,” असं स्वरा म्हणाली.

स्वरा भास्करशी आंतरधर्मीय लग्नाबद्दल फहाद अहमदचं वक्तव्य; फोटो शेअर करत म्हणाला…

दरम्यान, स्वरा व फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी त्यांची एंगेजमेंट झाली. आता मार्च महिन्यात ते दोघेही लग्न करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut congratulates swara bhasker wedding with fahad ahmad hrc