‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट शुक्रवारी (२८ जुलै रोजी) सिनेमागृहात प्रदर्शित झाला. करण जोहरचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह व आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत, पण दुसरीकडे कंगना रणौतने करण जोहरवर टीका केली आहे.

“आपल्या घरात कितीही कचरा असला तरी…”, किरण मानेंची शरद पोंक्षेंच्या मुलीसाठी पोस्ट, म्हणाले “तू त्यांना खोटं हसत…”

कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत करण जोहरवर टीका केली आहे. “भारतीय प्रेक्षक अण्वस्त्र निर्मिती आणि अणुविज्ञानावर आधारित ३ तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि इथे नेपोटिझम गँगची तीच सासू आणि सून रडगाण्याची स्टोरी, पण खरंच २५० कोटींची गरज का आहे? करण जोहर तुला लाज वाटली पाहिजे की तू एकसारखाच चित्रपट इतक्यांदा बनवत आहे. तू स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणतो. पैसे वाया घालवू नको, हा चित्रपटसृष्टीसाठी कठीण काळ आहे. निवृत्त हो आणि नवीन चित्रपट निर्माते येऊ दे जे नवीन आणि चांगले चित्रपट बनवतील, असं कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

kangana ranaut 1
कंगना रणौतची स्टोरी

करण जोहरसोबतच कंगना रणौतनेही रणवीर सिंहला सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये रणवीरला टॅग करत कंगनाने लिहिलं, “माझा सल्ला आहे की रणवीरने करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्सकडून प्रभावित होऊ नये. त्याने सामान्य माणसासारखे कपडे घालावेत, जसेच त्यांच्या काळात धरम जी आणि विनोद खन्ना घालायचे. भारतीय लोक स्वतःला हिरो म्हणवणाऱ्या कार्टून दिसणाऱ्या माणसाला ओळखत नाहीत, प्लीज साऊथच्या सर्व हिरोंना पाहा की ते कसे कपडे घालतात आणि स्वतःला कॅरी करतात.”

kangana ranaut 2
कंगना रणौतची स्टोरी

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर, आलियासह जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. रणवीरने पंजाबी मुलाची तर आलियाने बंगाली मुलीची भूमिका साकारली आहे.

Story img Loader