कंगना रणौत ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगना नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात येण्याविषयी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : …अन् पोलिसाच्या रुपात श्रेयस तळपदेला दिसला देव, बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्यावर आला ‘असा’ अनुभव, म्हणाला…

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

कंगना म्हणाली, “मी एक जागरुक आणि जबाबदार व्यक्ती आहे. मी राजकारणात येण्यासाठी माझी मतं मांडते किंवा काहीतरी वक्तव्य करते असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. पण, हे खोटं आहे. माझ्या मनात देशाविषयी खूप प्रेम असून मी एक देशभक्त आहे त्यामुळे मी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असते. यामागे कोणताही गुप्त हेतू नाही. सध्या मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे. आयुष्यात हा टप्पा गाठण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे.”

हेही वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष

‘चंद्रमुखी २’ चित्रपटाच्या माध्यमातून कंगना तामिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. यापूर्वी तिने ‘धामधूम’ आणि ‘थलायवी’ या तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याविषयी सांगताना ती म्हणाली, “राघव लॉरेंस सरांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिन्ही तामिळ चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’ने लोकांपर्यंत पोहोचवलं पण…”, छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्रीचा करिअरबद्दल खुलासा, म्हणाली…

दरम्यान, ‘चंद्रमुखी २’नंतर कंगना रणौत लवकरच बहुचर्चित ‘तेजस’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भारताच्या पहिल्या महिला फायटर जेट वैमानिकाची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader