Emergency Box Office Collection Day 1: अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र, ‘इमर्जन्सी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘इमर्जन्सी’ चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी हा कंगना राणौत यांना करोनानंतर सर्वाधिक ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यांच्या मागील ‘तेजस’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. पण ‘इमर्जन्सी’ने या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. इंडस्ट्रीतील अनेक एक्सपर्ट्सच्या अंदाजापेक्षा सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १ ते २ कोटींच्या दरम्यान कमाई करेल असे अंदाज अनेकांनी वर्तवले होते.

हेही वाचा – Coldplay Concert: पारंपरिक पोशाख परिधान करून ख्रिस-डेकोटाने घेतले बाबुलनाथ मंदिरात दर्शन, अभिनेत्रीची ‘ती’ कृती चर्चेत

कंगना राणौत यांच्या या चित्रपटाची पहिल्या दिवशी एकूण हिंदी ऑक्युपेन्सी १९.२६ टक्के होती, तर चेन्नईत २५ टक्के व मुंबईत २३.७५ टक्के होती. सकाळ व दुपारच्या तुलनेत चित्रपट पाहण्यासाठी रात्री जास्त प्रेक्षक गेले होते. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा सकाळचे शो पाहण्यासाठी ५.९८ टक्के प्रेक्षक गेले होते, तर दुपारचे शो पाहण्यासाठी १३.९५ टक्के, संध्याकाळचे शो पाहण्यासाठी २०.८६ टक्के आणि रात्रीचे शो पाहण्यासाठी ३६.२५ टक्के प्रेक्ष गेले होते.

हेही वाचा – “मालिका कलाकारांची अवस्था भिकाऱ्यासारखी…”, मराठी अभिनेत्याने सांगितली विदारक परिस्थिती; मुख्यमंत्र्यांना म्हणाला, “९० दिवसानंतर मिळणारं पेमेंट…”

कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू आहे. आता या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. पंजाबमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. काँग्रेसनेही या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (SGPC) देखील याला विरोध करत आहे.