चंदीगढ विमानतळावर नवनिर्वाचित खासदार कंगना राणौत यांना गुरुवारी एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली. या घटनेबद्दल अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. अनुपम खेर, रवीना टंडन, शबाना आझमी, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी घडलेला प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. आता कंगनांचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन आणि त्याचे वडील शेखर सुमन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘हीरामंडी’ फेम अभिनेता शेखर सुमन आणि अध्ययन सुमन यांनी एका कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांना सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावण्याप्रकरणी विचारण्यात आलं. सुरुवातीला अध्ययनने या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली, पण नंतर तो म्हणाला, “मला वाटतं की त्या महिलेच्या मनात काही वैयक्तिक द्वेष असेल तरी तिने सार्वजनिकपणे असं कृत्य करणं खूप चुकीचं आहे, असं व्हायला नको होतं.”
कंगना व अध्ययन यांनी एकमेकांना २००८ मध्ये डेट केलं होतं. पण वर्षभरातच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनी २०१६ मध्ये अध्ययन सुमनने डीएनएला एका मुलाखतीत म्हटलं होतं की कंगनाने त्याच्यावर काळी जादू केली होती.
Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा
शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
यासोबतच शेखर सुमन यांनीही ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना शेखर सुमन म्हणाले, “हे कोणाच्याही बाबतीत झालं तरी हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्या आता मंडीच्या माननीय खासदार आहेत. विरोध करायचा असला तरी तो करण्याची सभ्य पद्धत असते, हिंसाचार हा पर्याय नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे.”
कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला नोकरी देणार, बॉलीवूड गायक विशाल ददलानीची ऑफर
अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी
अनुपम खेर यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “मला खूप वाईट वाटलं. एका महिलेबरोबर दुसऱ्या महिलेने आपल्या पदाचा गैरफायदा घेत असं कृत्य केलं. हे पूर्णपणे चुकीचं आहे, यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” असं अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले.
सेलिब्रिटींनी पाठिंबा न दिल्याने कंगना यांनी केलेली पोस्ट
“‘ऑल आइज ऑन राफाह’ गँग हे तुमच्याबरोबर आणि तुमच्या मुलांबरोबरही घडू शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेला दहशतवादी हल्ला सेलिब्रेट करता तेव्हा तुमच्याबरोबरही हे घडेल, त्या दिवसासाठी तयार राहा,” असं कंगना रणौत यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं.