सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.आज अखेर हे दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. आता त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच त्यांच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त करताना कंगना रणौतने पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या आलिया भट्ट-रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे असं नेटकरी म्हणू लागले आहेत.
कंगना रणौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक मोठी पोस्ट शेअर करत बॉलिवूडमधील घराणेशाही वर भाष्य केलं होतं. तसंच तिची खासगी आणि प्रोफेशनल माहिती बॉलिवूड माफिया लीक करत आहे असा संशय ही तिने व्यक्त केला होता. आता तिने सिद्धार्थ आणि कियारा लग्नाच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा एक खोचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून तिने रणबीर-आलिया अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाबाबत एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली…
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटो आउट झाल्यावर ‘रश्मी रॉकेट’, ‘मलंग’ यांसारख्या चित्रपटांचा पटकथा लेखक अनिरुद्ध गुहाने सिद्धर्थ-कियाराचा एक फोटो शेअर केला आणि “ते डेट करत होते का?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत कंगनाने लिहिलं, “हो ते दोघं एकमेकांना करत होते, पण कोणत्याही ब्रँड किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी कधीही बॉलिवूडमधील नातेसंबंधांची दिखावा केला नाही… त्यांचं प्रेम एकदम खरं आहे, सुंदर जोडपं.” आता तिच्या या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “…तर घरात घुसून मारेन,” कंगना रणौतने व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी या पॅलेसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.