Kangana Ranaut वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कंगना रणौतचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट नियामक मंडळाने म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे अशी पोस्ट अभिनेत्री कंगनाने केली आहे. कंगनाने चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका केली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलिज होणार होता. मात्र सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने या चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख टळली. मात्र आता चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कंगनाने व्यक्त केला आनंद
कंगानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसला आणि एक्स अकाऊंटला ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे, ही माहिती देताना मला अत्यानंद होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर सेन्सॉर बोर्डानं ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरूस्ती होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सेन्सॉरने U/A सर्टिफिकेटही दिलं आहे. इमर्जन्सी चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे पण वाचा अखेर कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील, काही दृष्ये कापण्याची सूचना
सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल
सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल इमर्जन्सी चित्रपटात करण्यात आले आहेत. त्यामुळे, सेन्सॉरने आता या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. यापूर्वी हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र, सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्याचा मुहूर्त हुकला होता. आता, अखेर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. तसेच, सेन्सॉरने मंजुरी दिल्यामुळे लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असेही कंगनाने तिच्या एक्स अकाऊंटवरुन सांगितलं आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील सेन्सॉर बोर्डाने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला रिलीज करण्याची परवानगी दिली होती, पण यासाठी काही कडक सूचनाही दिल्या. रिलीजपूर्वी इमर्जन्सी चित्रपटात १० मोठे बदल करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासोबतच चित्रपटातून तीन मोठे सीन कापावे लागणार आहेत. या बदलांसोबतच चित्रपटात जिथे वादग्रस्त विधाने असतील तिथे वस्तुस्थिती दाखवावी, असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं. त्यानुसार, चित्रपटात बदल करण्यात आले आहेत. मात्र कंगनाने या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.