बहुप्रतिक्षीत ‘चंद्रमुखी २’ मधून अभिनेत्री कंगना रणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपटातील काही पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. लायका प्रॉडक्शनने चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये कंगना हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

शबाना आझमी व पती धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबाबत हेमा मालिनी म्हणाल्या, “धरमजींना नेहमी…”

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Eknath Khadse Marathi news
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचे सूर बदलले! “देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत वैर नाही, आम्ही काय भारत-पाकिस्तानासारखे…”
Pushpa, Red Sandal Tree, Red Sandal Tree Tadoba,
चंद्रपूर : ‘पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध लाल चंदनाचे झाड ताडोबा प्रकल्पात!

या पोस्टरमध्ये कंगना रणौतचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. हिरव्या रंगाची साडी, त्यावर खूप सारे दागिने घातलेला लूक व्हायरल होत आहे. सोबतच तिची पोज व तिची रोख नजर या पोस्टरमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

कंगनाचे लूक पोस्टर शेअर करताना लायका प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिल, ‘लक्ष वेधून घेणारे सौंदर्य आणि पोज! चंद्रमुखी २ मधील चंद्रमुखी म्हणून कंगना रणौतचा मोहक, जबरदस्त आणि सुंदर फर्स्ट लूक सादर करत आहोत. चित्रपट या गणेश चतुर्थीला तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे!’

दरम्यान, ‘चंद्रमुखी २’ हा ब्लॉकबस्टर तमिळ कॉमेडी चित्रपट ‘चंद्रमुखी’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात कंगना राजाच्या दरबारातील एका नर्तिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, जी तिच्या सौंदर्य आणि कलेसाठी प्रसिद्ध होती. या चित्रपटात कंगनासोबत राघव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन यांचा हा चित्रपट सप्टेंबरमध्ये तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader