Kangana Ranaut Grandmother dies: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचं निधन झालं आहे. त्या १०० पेक्षा अधिक वयाच्या होत्या. कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीवर आजीचे काही फोटो शेअर करून, तिच्या चाहत्यांबरोबर ही दुःखद बातमी शेअर केली. शुक्रवारी रात्री इंद्राणी ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. कंगनानं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत आजीसाठी एक संदेश लिहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना सोशल मीडियावर तिच्या आजीचे अधूनमधून फोटो पोस्ट करायची. आजीच्या निधनानंतर कंगना खूप भावूक झाल्याचं पोस्टवरून दिसत आहे.

हेही वाचा…कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, “मी अमेरिकन असते तर…”

कंगनाची आजीबरोबरची आठवण

कंगनानं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ती आजीबरोबर हसत बसल्याचे दिसते. तर, दुसऱ्या फोटोत आजी आजारी अवस्थेत बिछान्यावर पडलेली असून, कंगना तिच्या शेजारी बसून दु:खी मुद्रेत दिसत आहे.

कंगनाच्या आजीने दिले होते मुलींना करिअर करण्याचे स्वातंत्र्य

कंगनाने लिहिलं, “काल रात्री माझ्या नानीजी इंद्राणी ठाकूर यांचं निधन झालं. संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करा.” पुढे तिनं लिहिलं, “माझी नानी एक विलक्षण स्त्री होती.तिची पाच मुलं आहेत. नानाजींकडे मोजकीच संपत्ती असूनही तिनं सर्वांना उच्च शिक्षण दिलं. तिनं तिच्या मुलींनासुद्धा करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं.”

शुक्रवारी रात्री इंद्राणी ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. कंगनानं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत आजीसाठी एक संदेश लिहिला आहे. (Photo Credit – Kangana Ranaut Instagram)

हेही वाचा…“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

शंभर वर्षांहून अधिक वयातही स्वावलंबी

कंगना पुढे लिहिते, “माझ्या नानीनं आम्हाला खूप काही दिलं आहे. ती ५ फूट ८ इंच उंच होती. ही उंची असणं पर्वतीय (पहाडी) भागातील स्त्रियांसाठी खूप दुर्मीळ गोष्ट आहे. माझ्या उंचीचं श्रेय मी माझ्या नानीला देईन. तिचं आरोग्य इतकं चांगलं होतं की, १०० वर्षांहून अधिक वय असूनही ती सर्व कामं स्वत: करीत असे.”

शुक्रवारी रात्री कंगनाच्या आजीनं अखेरचा श्वास घेतला. कंगनानं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत आजीसाठी एक संदेश लिहिला आहे. (kangana ranaut instagram)

आजीला शेवटचा निरोप

शेवटच्या फोटोत कंगना तिच्या आजीच्या शेजारी बसलेली दिसते. तिनं आजीच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आहे. फोटोबरोबर कंगनानं लिहिलं, “काही दिवसांपूर्वी, ती तिच्या खोलीत स्वच्छता करीत असताना तिला स्ट्रोक आला आणि ती अंथरुणाला खिळली. हा काळ तिच्यासाठी खूप वेदनादायी होता. ती खूप प्रेरणादायी आयुष्य जगली आहे आणि ती आमच्या कायमच स्मृतीत राहील.”

हेही वाचा…अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी

‘इमर्जन्सी’ लवकरच होणार प्रदर्शित

कंगनानं तिच्या आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगनानंच या चित्रपटाच दिग्दर्शन केलं असून, हा चित्रपट आधी ६ सप्टेंबरला २०२४ ला प्रदर्शित होणार होता. परंतु, सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला. आता सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले असून, चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौतप्रमाणेच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी व मिलिंद सोमण यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut grandmother passes away actress shares heartfelt tribute on instagram story psg